मुंबई : महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर वाढला असून, विशेषतः कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई आणि उपनगरात ‘यलो अलर्ट’ जारी
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात आज काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. यामुळे शहरात वाहतूक कोंडी, पाणी साचणे आणि सार्वजनिक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, असा सल्ला प्रशासनाने मुंबईकरांना दिला आहे.
ठाणे आणि नवी मुंबई शहरांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. जोरदार पावसामुळे शहरात पाणी साचण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे, तर काही वेळा तो ४५ किमी प्रतितासांपर्यंत जाऊ शकतो. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे आणि झाडांखाली, नदीकाठावर किंवा उघड्या ठिकाणी उभे राहणे टाळावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
पालघर जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून, यासाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. समुद्राजवळ राहणाऱ्या लोकांनी सावध राहावे आणि मासेमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज पडून किंवा झाडे उन्मळून दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणातील जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी आज ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये आज देखील मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने, डोंगराळ भाग, नदीकाठ आणि घाटमाथ्यांवरील गावांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात 30 जुलै रोजी सुनावणी!
दिल्ली : शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने संबंधित दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले...
Read moreDetails