राज्यात पावसाचा जोर सध्या कमी झाला असला तरी, अनेक ठिकाणी ऊन आणि पावसाचा लपंडाव सुरू आहे, ज्यामुळे श्रावणातील आल्हाददायक वातावरणाचा अनुभव मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) विदर्भासाठी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. राज्याच्या उर्वरित भागांमध्ये ढगाळ आकाश असून, तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती:
पुणे जिल्ह्यात पावसाने काही प्रमाणात उसंत घेतली आहे. घाटमाथा आणि धरण परिसरातही पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २.८ मिमी पावसाची नोंद झाली, तर कमाल तापमान २६.५ अंश सेल्सिअस होते. पुढील २४ तासांत संपूर्ण पुणे जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता असून, कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
असेच सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील २४ तासांत साताऱ्याचे कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असून, जिल्ह्यात रिमझिम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ९ मिमी पावसाची नोंद झाली असून, कमाल तापमान २६.१ अंश सेल्सिअस होते. पुढील २४ तासांत कमाल तापमान २६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील आणि दिवसभर हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
धरणांमधून विसर्ग कमी, नदीकाठच्या गावांना दिलासा
जुलै महिन्याच्या अखेरीस राज्यात झालेल्या जोरदार पावसानंतर आता पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे, पण तो अधिक सौम्य स्वरूपात आहे. ऊन-सावलीच्या खेळामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग कमी होत आहे, ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बारामती-इंदापूर मार्गावर एसटी बसमध्ये प्रवाशावर कोयत्याने हल्ला
बारामती - बारामती येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामती-इंदापूर मार्गावर धावणाऱ्या एका एसटी बसमध्ये एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला...
Read moreDetails