Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

लाडकी बहीण योजनेला वळवलेला SC-ST चा ४,६०१ कोटींचा निधी परत करा; अन्यथा मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढू – राजेंद्र पातोडे

mosami kewat by mosami kewat
August 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
लाडकी बहीण योजनेला वळवलेला SC-ST चा ४,६०१ कोटींचा निधी परत करा; अन्यथा मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढू – राजेंद्र पातोडे
       

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती घटकांशी संबंधित सुमारे ४,६०१.१३ कोटी निधी वापरासाठी हस्तांतरित करण्यात आला आहे, ह्या योजनेत जवळ जवळपास एक कोटी महिला अपात्र करण्यात आल्या असून अनेक पुरुषांनी देखील लाभ घेतला आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या विकासासाठी राखीव निधीबाबत शिक्षण, शिष्यवृत्ती, आरोग्य, पाणी आणि दलीत आदिवासी वस्ती विकासासाठी न वापरता व्यक्तिगत योजनेवर वळता करण्यात आला आहे. तो निधी तातडीने सामाजिक न्याय विभाग व आदिवासी विकास विभागाला परत करावा अन्यथा सामाजिक न्याय मंत्र्याचे घरावर वंचित बहुजन आघाडी मोर्चे काढेल असा इशारा प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी सरकारला दिला आहे.

अनुसूचित जाती घटकातून ३,५९४.०३ कोटी निधी वळविला आहे. यामध्ये ३४४.३० कोटी सहावेळा, ९८.४५ कोटी आणि ३४४.७४ कोटींच्या दोन वेळा व ६८९.४८ कोटी रकमेचा समावेश आहे. अनुसूचित जमाती आदिवासी घटकाचा १,००७.१० कोटी निधी वळविला आहे. अशा प्रकारे या दोन्ही घटकांची एकत्रित ४,६०१.१३ कोटी इतकी होते.

अनुसूचित जाती जमाती बजेट मधून चोरण्यात आले आहे. ह्या बजेट चोरी निधीची तारीख निहाय, विभागनिहाय आणि योजना निहाय माहिती आमच्या कडे उपलब्ध आहे. हा निधी समूहाच्या विकासाचा असून खाजगी योजनेत त्यामध्ये गैरप्रकार झाल्याचे सरकारची आकडेवारी सिद्ध करते. ह्यामध्ये सामाजिक न्याय व आदिवासी मंत्री यांनी तातडीने ४,६०१.१३ ह्यांनी हा निधी महिला बाल कल्याण कडून सामाजिक न्याय व आदिवासी विभागाला परत आणावा. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने स्वतंत्र निधी द्यावा अशी आमची मागणी आहे.

Also Read : विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी आणि भविष्याशी होणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही; MPSC पेपर फुटीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर संतप्त ! 

अनुसूचित जाती जमाती विद्यार्थी आपल्या हक्कासाठी आंदोलने करीत असताना त्याची दखल न घेता सरकार त्याचा बजेट चोरी करत आहे, हे सहन केले जाणार नाही. हा निधी तातडीने परत न झाल्यास वंचित बहुजन आघाडी सामाजिक न्याय मंत्र्यांच्या आणि आदिवासी मंत्री ह्यांचे घरावर मोर्चे सहित धडकणार आहे.

सरकारने तातडीने दखल घेऊन अनुसूचित जाती-जमातींच्या निधीबाबत परत करण्याची कार्यवाही करावी. अन्यथा लोकशाही आणि संविधानिक मार्गाने सामाजिक न्याय मंत्र्यांच्या निवासस्थानावर तीव्र आंदोलन करून मोर्चे निघतील त्याला सामाजिक न्याय आणि आदिवासी मंत्री ह्यांनी तयार रहावे,वेळ पडल्यास रस्त्यावरच्या लढ्या सोबत न्यायालयीन लढा देखील उभा केला जाईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.


       
Tags: bjpLadki Bahin YojanaMaharashtraPoliticalRajendra PatodescSC ST FundsstVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी आणि भविष्याशी होणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही; MPSC पेपर फुटीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर संतप्त ! 

Next Post

आदिवासी विद्यार्थ्यांचा लढा आणि राजकीय वास्तव

Next Post
आदिवासी विद्यार्थ्यांचा लढा आणि राजकीय वास्तव

आदिवासी विद्यार्थ्यांचा लढा आणि राजकीय वास्तव

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वर्धा हिंदी विद्यापीठात दलित, आदिवासी,ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय; ‘एफआयआर आणि कारवाई ब्राह्मणवादी प्रवृत्तीची’ – सुजात आंबेडकर
बातमी

वर्धा हिंदी विद्यापीठात दलित, आदिवासी,ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय; ‘एफआयआर आणि कारवाई ब्राह्मणवादी प्रवृत्तीची’ – सुजात आंबेडकर

by mosami kewat
September 15, 2026
0

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांशी तातडीने संपर्क साधण्याची मागणी! मुंबई : वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील दलित, आदिवासी...

Read moreDetails
प्रशासकीय कार्यकाळ संपल्यानंतर ग्रामसभा बोलावल्याचा आरोप; माहुली जहागीर पोलिसांना ‘वंचित’चा इशारा

प्रशासकीय कार्यकाळ संपल्यानंतर ग्रामसभा बोलावल्याचा आरोप; माहुली जहागीर पोलिसांना ‘वंचित’चा इशारा

September 15, 2026
चांदवड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीला बळ; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

चांदवड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीला बळ; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

September 15, 2026
हवामान मोजणारी यंत्रणाच बंद असताना ५५० कोटी खर्चाचा घाट नक्की कुणासाठी ?

हवामान मोजणारी यंत्रणाच बंद असताना ५५० कोटी खर्चाचा घाट नक्की कुणासाठी ?

September 15, 2026
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home