महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत, ही एक अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. राज्य सरकारने समुपदेशन केंद्र, शेतीमालाला योग्य भाव आणि सिंचन सुविधा वाढवण्यासारखे अनेक उपाययोजना केल्याचा दावा केला असला तरी, गेल्या आठ महिन्यांत ११८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
या आकडेवारीनुसार, जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत ही भयावह परिस्थिती दिसून येते. सर्वाधिक आत्महत्यांची नोंद अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागात झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात ५२० तर पश्चिम विदर्भात ७०७ शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. विशेष म्हणजे, ऑगस्ट महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात तब्बल ४४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने परिस्थितीची भीषणता अधिक स्पष्ट होते.
शेतकरी आत्महत्यांची कारणे आणि मदतीची स्थिती:
या आत्महत्यांची मुख्य कारणे अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा आणि शेतमालाला योग्य हमीभाव न मिळणे अशी आहेत.
आत्महत्या केलेल्या ११३८ शेतकऱ्यांपैकी केवळ ६०७ शेतकरी कुटुंबं मदतीसाठी पात्र ठरली आहेत, तर ३०६ आत्महत्या अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. यामुळे सरकारी मदतीची प्रक्रिया आणि धोरणांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रातील १४ शेतकरी आत्महत्या प्रवण जिल्ह्यांमध्ये विदर्भातील सहा आणि मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. सरकारने केलेल्या उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे लातूर आणि उस्मानाबादमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मार्गदर्शन
लातूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन...
Read moreDetails