मुंबई(६डिसेंबर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर येथे लाखों भीम अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. आलेल्या भीम अनुयायांची सोय करण्याची जबाबदारी मुंबई महानगर पालिकेवर असते. परंतु महानगर पालिकेने भीम अनुयायांच्या सोयीबाबत उदासीनता दाखवल्याचे दिसले.
शिवाजी पार्क परिसरामध्ये माहिती पुस्तकात आणि एल.ई.डी. स्क्रीन वर तसेच माहिती मध्ये 22 फिरते शौचालय दाखवले होते. त्यामधील फक्त 10 शौचालय त्याठीकाणी होते. 12 फिरते शौचालय गायब होते.
तिथे निर्माण केलेले जे शौचालय आहेत त्यात देखील अपुऱ्या सुविधा भीम अनुयायांना जाणवले. महिला शौचालयात पुरुष कर्मचारी सफाई करत असल्याचे देखील त्यांना दिसले.
पिण्याच्या पाण्याचे 380 नळ दाखविले होते. त्यामधील 120 नळ प्रत्यक्षात तिथे दिसले. तेथील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता शौचालयाचे देखील पाणी पिण्याचेच आहे.अशी वल्गना त्यांनी केली.
निवासी मंडपातील फॅन बंद असल्याचे दिसले. मोबाईल चार्जिंग 300 पोंईट दिले होते. ते देखील कमी असल्याचे निदर्शनास आले.
एल.ई.डी. वरती जाणीवपूर्वक गणपती मंडळांचे देखावे दाखवले गेले. तसेच भीम गितांऐवजी भक्ती गीते त्यावर दाखवण्यात आली.
मदत कक्षातून अधिकारी-कर्मचारी गायब असल्याचे दिसले. ते कोणाचाही फोन स्वीकारत नव्हते. त्याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना अपूर्ण माहिती असल्याचे देखील यावेळी निदर्शनास आले.