Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महाज्योती कडून १२२६ संशोधक ओबीसी विद्यार्थ्यांची सहा महिने पासून अडवणूक – राजेंद्र पातोडे.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 28, 2023
in बातमी, राजकीय
0
महाज्योती कडून १२२६ संशोधक ओबीसी विद्यार्थ्यांची सहा महिने पासून अडवणूक – राजेंद्र पातोडे.
       

३० एप्रिल पर्यंत अधिछात्रवृत्ती न दिल्यास वंचित युवा आघाडी घेराव घालणार

नागपूर, दि. २८ – महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) कडून १२२६ संशोधक ओबीसी विद्यार्थ्यांची सहा महिने पासून अधिछात्रवृत्तीसाठी अडवणूक करण्यात येत असून ३० एप्रिल पर्यंत अधिछात्रवृत्ती न दिल्यास वंचित युवा आघाडी महाज्योती कार्यालयास घेराव घालणार असल्याचा इशारा वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती, नागपूर ह्यांना पाठविलेल्या ई मेल द्वारे दिला आहे.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) १२२६ ओबीसी संशोधक विद्यार्थीना अधिछात्रवृत्ती मंजूर होऊन सहा महिने उलटले असले तरी एकाही विद्यार्थ्यांस त्याचा लाभ मिळालेला नाही.शासना कडून व संचालक मंडळा कडून ओबीसी विद्यार्थ्यांच्या संशोधनामध्ये आडकाठी आणली जात आहे. महाज्योती कडून १२२६ संशोधक ओबीसी विद्यार्थ्यांची सहा महिने पासून अडवणूक होत असून ३० एप्रिल पर्यंत अधिछात्रवृत्ती न दिल्यास वंचित युवा आघाडी कडून घेराव घालुन आंदोलन करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या संशोधन कामात जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करण्यात येत आहे, असा वंचित बहूजन युवा आघाडी चा आरोप आहे. आपण बार्टी सारख्या संस्थेत केलेल्या कामामुळे आपल्या प्रशासकीय कामाचा विशेष ठसा उमटवला होता. सबब व्यवस्थापकीय संचालक ह्या नात्याने आपण पुढाकार घेऊन संचालक मंडळाचे माध्यमातून हा तिढा ३० एप्रिल २०२३ पर्यंत सोडवावा अन्यथा वंचित बहूजन युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष डॉ निलेश विश्वकर्मा आणि महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांचे नेतृत्वाखाली १२२६ ओबीसी संशोधक विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाज्योती कार्यालयास घेराव घालण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

‘महाज्योती’च्या वतीने इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांचा संशोधनाचा टक्का वाढावा म्हणून अधिछात्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असल्याने पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट अधिछात्रवृत्तीचा लाभ द्यावा, असा निर्णय ‘महाज्योती’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.त्यानुसार अधिछात्रवृत्तीसाठी प्राप्त १५३९ अर्ज मधून मूळ कागदपत्रांची छाननी करून १२२६ जणांना अधिछात्रवृत्ती मंजूर झाली आहे.निवड झालेल्यांची तात्पुरती यादी सहा महिन्यांआधी जाहीर करण्यात आली. १ नोव्हेंबरपासून अधिछात्रवृत्ती दिली जाणार होती.प्रथम दोन वर्षासाठी दरमहा ३१ हजार रुपये, घरभाडे भत्ता व आकस्मिक खर्च वेगळा व त्यानंतर तीन वर्षांसाठी ३५ हजार रुपये दरमहा दिले जातील असे जाहीर करण्यात आले होते.लाभार्थ्यांनाही घरभाडे भत्ता, आकस्मिक खर्च वेगळा दिला जाणार होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिछात्रवृत्ती दिली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.हे पाऊल अभिनंदन करण्यासारखे होते.

मात्र, सहा महिन्यांआधी ही अधिछात्रवृत्ती मंजूर झाली असताना अद्यापही विद्यार्थ्यांना ती अदा करण्यात आलेली नाही. यामुळे अधिछात्रवृत्तीच्या भरवशावर असणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांचे जाणीवपूर्वक नुकसान करण्यात येत आहे. शासनाकडून अधिछात्रवृत्ती देण्यास नवनवीन कारणे शोधून अडवणूक केली जात असल्याचा आरोप संशोधक विद्यार्थ्यांकडून होत आहे. करीता सदर निवेदनाद्वारे वंचित बहूजन युवा आघाडी अशी मागणी करते की, संचालक मंडळाचे माध्यमातून हा तिढा ३० एप्रिल २०२३ पर्यंत सोडवावा अन्यथा वंचित बहूजन युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष डॉ निलेश विश्वकर्मा आणि महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांचे नेतृत्वाखाली १२२६ ओबीसी संशोधक विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाज्योती कार्यालयास घेराव घालण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.


       
Tags: FELLOWSHIPMahajyotiVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे पुढे काय झाले ?

Next Post

वंचित युवा आघाडीने घेराव घालण्याच्या इशारा देताच महाज्योती कडून तातडीने १२२६ संशोधक ओबीसी विद्यार्थ्यांची अधिछात्रवृत्ती मंजूर – राजेंद्र पातोडे.

Next Post
महाज्योती कडून १२२६ संशोधक ओबीसी विद्यार्थ्यांची सहा महिने पासून अडवणूक – राजेंद्र पातोडे.

वंचित युवा आघाडीने घेराव घालण्याच्या इशारा देताच महाज्योती कडून तातडीने १२२६ संशोधक ओबीसी विद्यार्थ्यांची अधिछात्रवृत्ती मंजूर - राजेंद्र पातोडे.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन धान्यावरून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रशासनाला इशारा
बातमी

अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन धान्यावरून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रशासनाला इशारा

by mosami kewat
July 5, 2025
0

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन धान्याच्या अपुऱ्या पुरवठ्यावरून वंचित बहुजन आघाडीने जिल्हा प्रशासनाला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या तीन...

Read moreDetails
अकोल्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर धावत्या ऑटोमध्ये विनयभंग; नराधम चालक गजाआड

अकोल्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर धावत्या ऑटोमध्ये विनयभंग; नराधम चालक गजाआड

July 5, 2025
समाज सेवेचे व्रत शेवटच्या श्वासापर्यंत निभावण्याची ग्वाही! चंद्रप्रकाश देगलूरकर एकसष्टी उत्साहात साजरा

समाज सेवेचे व्रत शेवटच्या श्वासापर्यंत निभावण्याची ग्वाही! चंद्रप्रकाश देगलूरकर एकसष्टी उत्साहात साजरा

July 5, 2025
कॉलेजमधील बौद्ध विद्यार्थ्याला अमानुष मारहाण; १२ विद्यार्थ्यांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, VBA कडून आंदोलनाचा इशारा

कॉलेजमधील बौद्ध विद्यार्थ्याला अमानुष मारहाण; १२ विद्यार्थ्यांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, VBA कडून आंदोलनाचा इशारा

July 5, 2025
महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय ; कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट!

Pune Monsoon : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय ; कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट!

July 5, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क