तलावाचे पाणी मंठा तालुक्यातील लिंबे वडगांव दलित वस्तीच्या घरात शिरण्याची शक्यता
जालना : मंठा तालुक्यातील लिंबे वडगाव दलित वस्ती ते मंठा जाणाऱ्या रस्त्याच्या पाटोदा साठवण तलावातील पाणी पातळी वाढल्यामुळे संपर्क तुटला असून रस्ता करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
पाटोदा साठवण तलावामुळे तलावाची पाणी पातळी वाढल्याने दलित वस्तीच्या घरात पाणी शिरण्याची भिती निर्माण झाली आहे. वस्तीतील विद्यार्थी व नागरीकांना हॉस्पिटलसाठी पाण्यातून जिवघेणा प्रवास करावा लागत आहे, तातडीने सदरील वस्तीचे दळणवळण सुरळीत करण्यात यावे व जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून संवेदनशीलता दाखवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, अँड अशोक खरात,अचित जाधव, रामेश्वर महाजन, विजय जाधव, सतिश डोंबे, दिपक जाधव, गजानन होळकर,बालु विभुते, रोहिदास सदावर्ते,गौतम मगर, सुनील मगर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.