प्रा. अंजलीताई आंबेडकरांचे अकोल्यातील जनतेला आवाहन
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी अकोल्यातील जनतेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना संसदेत पाठवण्याचे आवाहन केले आहे.
26 जानेवारी 2025 ला भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. अशा वेळी भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचे वारस असलेले ॲड. बाळासाहेब आंबेडकर संसदेत असणे ही आपली सगळ्यांची ऐतिहासिक जबाबदारी आहे. त्यामळे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला बहुमोल मताचा अधिकार बजावावा. लोकशाही शासन व्यवस्था सक्षम करण्यासाठी आपण सगळेजण आपला मताचा अधिकार बजावून ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना संसदेत पाठवूया, असे आवाहन प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी केले आहे.