लेह-लडाख : लेह-लडाखला राज्याचा दर्जा आणि संविधानिक अधिकार बहाल करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. ‘लडाख बंद’ च्या घोषणेदरम्यान संतप्त झालेल्या तरुणांनी मोठे थैमान घातले. आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या पेटवल्या, जोरदार दगडफेक केली आणि स्थानिक भाजप कार्यालयाला लक्ष्य करत ते पेटवून दिले.
परिस्थिती हाताबाहेर, अतिरिक्त पोलीस दल तैनात परिस्थिती झपाट्याने हाताबाहेर गेल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीमारही केला, परंतु आंदोलन अधिकच चिघळले. अखेरीस, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस दलाला पाचारण करावे लागले. सध्या येथील स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वांगचुक यांचे उपोषण सुरूच, वाढता रोष
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे गेल्या अनेक दिवसांपासून याच मागणीसाठी उपोषण करत आहेत. त्यांच्यासोबत अनेक तरुण आणि महिला आंदोलनात सक्रिय आहेत.
१) मागील १५ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची व्याप्ती आता वाढू लागली आहे.
२) उपोषणामुळे दोन महिला आंदोलकांना रुग्णालयात दाखल करावे लागल्यानंतर आंदोलकांमध्ये प्रचंड रोष पसरला, ज्यामुळे आंदोलनाने हिंसक स्वरूप धारण केले.
३) या संतप्त आंदोलकांनी केवळ पोलिसांवरच नव्हे, तर सरकारी कार्यालये आणि भाजप कार्यालयालाही निशाणा बनवले.
दुःखद! ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा
मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. 'मैं हूं ना', 'कल हो ना हो', 'ओम शांति ओम' अशा...
Read moreDetails





