Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुणे-बारामतीत ED ची धडक! 108 कोटींच्या अपहार प्रकरणी फरार आनंद लोखंडेच्या मालमत्तांवर छापे; राजकीय कनेक्शनची चर्चा

mosami kewat by mosami kewat
December 10, 2025
in बातमी, राजकीय
0
पुणे-बारामतीत ED ची धडक! 108 कोटींच्या अपहार प्रकरणी फरार आनंद लोखंडेच्या मालमत्तांवर छापे; राजकीय कनेक्शनची चर्चा
       

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सक्रिय असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज पुणे आणि बारामती जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई केली आहे. विद्यानंद डेअरीशी संबंधित तब्बल ₹108 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार आणि गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणात ईडीने ही धडक मोहीम उघडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी, आनंद सतीश लोखंडे सध्या फरार आहे.

ईडीच्या पथकांनी पुणे जिल्ह्यात दोन ठिकाणी आणि बारामती तालुक्यात जळोची, खताळ पट्टा, तसेच झारगडवाडी यांसह तीन ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीम सुरू केली. फरार आनंद लोखंडे आणि त्याची पत्नी विद्या लोखंडे यांच्याशी संबंधित मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आले. दोघांवरही विविध ठिकाणी मिळून ₹108 कोटींपेक्षा जास्त व्यवहार केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

नेमका घोटाळा काय?

आरोपींनी बारामती डेअरी प्रायव्हेट लिमिटेड आणि पुणे-मुंबईतील अनेक व्यावसायिकांना दुग्ध व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून ₹10 कोटींहून अधिक रुपयांना गंडा घातला. तसेच मुंबईतील एका कंपनीकडून ₹2 कोटींचे लोणी आणि सुमारे ₹93 लाखांचे दूध खरेदी करून त्याचे पैसे थकवल्याचेही तपासात उघड झाले आहे.

दरम्यान, या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, यात शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांवर पतसंस्थांचे कर्ज काढून फसवणूक करणे तसेच मंत्रालयातील काही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचीही गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक केल्याची माहिती मिळाली आहे.

आनंद लोखंडे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता आणि निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे.

लोखंडे याने आमदार रोहित पवारांच्या विधानसभा मतदारसंघात शाळा बांधणे आणि गणवेश वाटणे अशा सामाजिक कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केल्याची माहिती समोर येत आहे. ईडीची कारवाई मुळे बारामती आणि पुणे जिल्ह्यांमध्ये राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


       
Tags: BaramatiEDMaharashtrapuneRohit pawarvbaforindia
Previous Post

बाबासाहेबांच्या उपस्थितीत १९४५ साली अकोल्यात संपन्न झालेली वऱ्हाड प्रांतिक शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनची परिषद

Next Post

प्रेमा साळवी यांचे मुंबईत निधन; अंत्यविधीसाठी आंबेडकर कुटुंबीयांची उपस्थिती!

Next Post
प्रेमा साळवी यांचे मुंबईत निधन; अंत्यविधीसाठी आंबेडकर कुटुंबीयांची उपस्थिती!

प्रेमा साळवी यांचे मुंबईत निधन; अंत्यविधीसाठी आंबेडकर कुटुंबीयांची उपस्थिती!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हॅपिनेस इंडेक्स २०२६: स्कॅन्डेनेव्हियन देशांचे यश आणि भारतापुढील आव्हाने
अर्थ विषयक

हॅपिनेस इंडेक्स २०२६: स्कॅन्डेनेव्हियन देशांचे यश आणि भारतापुढील आव्हाने

by mosami kewat
March 21, 2026
0

- संजीव चांदोरकर  दोन दिवसापूर्वी “वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स-२०२६” अहवाल प्रसिद्ध झाला.  खरेतर तर त्याचे नामांकन अन-हॅपीनेस इंडेक्स करायला हवे. वर्ल्ड...

Read moreDetails
२३ मार्चच्या नागपूर मोर्चासाठी वाहनांना टोलमाफी द्या; यवतमाळमध्ये 'वंचित'चे प्रशासनाला निवेदन

२३ मार्चच्या नागपूर मोर्चासाठी वाहनांना टोलमाफी द्या; यवतमाळमध्ये ‘वंचित’चे प्रशासनाला निवेदन

March 21, 2026
२३ मार्चच्या 'आरएसएस' मुख्यालय मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; अकोला जिल्ह्यात बैठकांचा धडाका

२३ मार्चच्या ‘आरएसएस’ मुख्यालय मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; अकोला जिल्ह्यात बैठकांचा धडाका

March 21, 2026
गाझियाबाद पोलिसांची मोठी कारवाई; ७ राज्यांत साखळी बॉम्बस्फोटांचा कट उधळला, ISI चे ९ हस्तक अटकेत!

गाझियाबाद पोलिसांची मोठी कारवाई; ७ राज्यांत साखळी बॉम्बस्फोटांचा कट उधळला, ISI चे ९ हस्तक अटकेत!

March 21, 2026
महिलांना मोक्ष आणि व्याधी मुक्तीसाठी शोषणाचा खरात व शुकदास पॅटर्न ?

महिलांना मोक्ष आणि व्याधी मुक्तीसाठी शोषणाचा खरात व शुकदास पॅटर्न ?

March 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home