Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कॉलेजमधील बौद्ध विद्यार्थ्याला अमानुष मारहाण; १२ विद्यार्थ्यांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, VBA कडून आंदोलनाचा इशारा

mosami kewat by mosami kewat
July 5, 2025
in बातमी
0
कॉलेजमधील बौद्ध विद्यार्थ्याला अमानुष मारहाण; १२ विद्यार्थ्यांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, VBA कडून आंदोलनाचा इशारा

कॉलेजमधील बौद्ध विद्यार्थ्याला अमानुष मारहाण; १२ विद्यार्थ्यांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, VBA कडून आंदोलनाचा इशारा

‎ लातूर : रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील डॉ. एन. वाय. तासगावकर कॉलेजमध्ये शिकत असलेल्या अरहंत मनोज लेंढाणे (वय २१, रा. लातूर) या बौद्ध विद्यार्थ्याला जातीवाचक शिवीगाळ करून हॉकी स्टिक आणि लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

‎याप्रकरणी अरहंतच्या तक्रारीवरून १२ विद्यार्थ्यांविरोधात शिवीगाळ, मारहाण आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक न केल्याने वंचित बहुजन आघाडीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. ‎ ‎

काय घडले? ‎

‎मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. एन. वाय. तासगावकर कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला शिकत असलेला अरहंत मनोज लेंढाणे या बौद्ध विद्यार्थ्याला २ जून २०२५ रोजी कॉलेजमधील काही गुंड प्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांनी जातीवाचक शिवीगाळ करत अमानुष मारहाण केली. “तू महाड्या आहेस, कमी मार्क्स घेऊन आलास आणि आमच्यामध्ये बसलास. तुझी लायकी नाही आणि डॉक्टर बनायला आलास,” अशा अर्वाच्य भाषेत त्याला शिवीगाळ करण्यात आली. ‎ ‎

हॉकी स्टिक आणि लाथाबुक्क्यांनी त्याला मारहाण करण्यात आली, तसेच त्याच्या गुप्त अंगावरही लाथा मारण्यात आले. ‎ ‎मारहाणीनंतर अरहंत तक्रार करेल या भीतीने आरोपी विद्यार्थ्यांनी त्याला एका खोलीत डांबून ठेवले. २२ जून २०२५ रोजी अरहंतने मारहाणीचे फोटो आपल्या आई-वडिलांना पाठवले.

त्यानंतर अरहंतची आई मेनेका लेंढाणे यांनी तात्काळ त्याला घेऊन पोलीस ठाणे गाठले. ‎ ‎गुन्हा दाखल, तरीही अटक नाही ‎ ‎अरहंतच्या तक्रारीवरून विजय ढोणे, रोहन जावणे, तन्मय कापुरे, मिल्खा सिंग, मयूर पवार, संदेश काळे, आफताब मुजावर, तेजस गावित, वेदांत सानप, गौरव मडके, ओंकार लोहार यांच्यासह एकूण १२ विद्यार्थ्यांविरोधात शिवीगाळ, मारहाण आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‎

‎मात्र, गुन्हा दाखल होऊन पाच दिवस उलटले तरी संबंधित पोलिसांनी आरोपींना अटक केली नसल्याचा आरोप अरहंतच्या कुटुंबीयांनी केला आहे. आरोपी हे बड्या घरची मुले असल्याने पोलीस त्यांना पाठीशी घालत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ‎ ‎याप्रकरणी अरहंतची आई मेनेका लेंढाणे यांनी तासगावकर कॉलेजकडेही आरोपी विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

परंतु, कॉलेज व्यवस्थापनाने अरहंत अनुसूचित जातीचा विद्यार्थी असल्याने या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आरोपी विद्यार्थ्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‎ ‎वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा ‎या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हा आयटी प्रमुख राहुल सोनवणे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. ‎जातीवाचक शिवीगाळ करून अरहंत लेंढाणे या विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. ‎

Tags: casecollegecrimekarjatvbaforindia
Previous Post

Pune Monsoon : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय ; कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट!

Next Post

अकोल्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर धावत्या ऑटोमध्ये विनयभंग; नराधम चालक गजाआड

Next Post
अकोल्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर धावत्या ऑटोमध्ये विनयभंग; नराधम चालक गजाआड

अकोल्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर धावत्या ऑटोमध्ये विनयभंग; नराधम चालक गजाआड

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जातीय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर बहुजनांवर केलेला गुन्हा आहे
बातमी

जातीय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर बहुजनांवर केलेला गुन्हा आहे

by Tanvi Gurav
July 27, 2025
0

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा राहुल गांधीच्या वक्तव्यावर निशाणा मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच दिलेल्या एका वक्तव्यात "जातीय...

Read moreDetails
उदगीरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पक्षप्रवेश सोहळा भव्यदिव्य पार पडला; शेकडो नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश

उदगीरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पक्षप्रवेश सोहळा भव्यदिव्य पार पडला; शेकडो नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश

July 27, 2025
वंचित बहुजन युवा आघाडीचा अकोट तालुक्यात झंजावात; आठ सर्कलसाठी बैठका, शाखा नियोजन आणि तिरंगा रॅलीची तयारी

वंचित बहुजन युवा आघाडीचा अकोट तालुक्यात झंजावात; आठ सर्कलसाठी बैठका, शाखा नियोजन आणि तिरंगा रॅलीची तयारी

July 27, 2025
श्रावणी शनिवारची भक्तीमय पर्वणी; शनिशिंगणापूरला भाविकांची अलोट गर्दी

श्रावणी शनिवारची भक्तीमय पर्वणी; शनिशिंगणापूरला भाविकांची अलोट गर्दी

July 27, 2025
धर्म विचारून गाय चोरीचा आरोप करून मारहाण झालेल्या राहून पैठणकर यांची घेतली वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी भेट.!

धर्म विचारून गाय चोरीचा आरोप करून मारहाण झालेल्या राहून पैठणकर यांची घेतली वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी भेट.!

July 27, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home