पिंपरी-चिंचवड: शहरातील वाहतुकीसाठी वर्दळीचा भाग असलेल्या काळेवाडी फाटा येथे आज सकाळी एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिली, ज्यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी जेव्हा काळेवाडी फाटा परिसरात नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ सुरू होती, तेव्हा हा अपघात घडला. एक दुचाकीस्वार आपल्या कामासाठी जात असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्याला भीषण धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली आला आणि गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. (Pimpari chinchwad accident)
चालक फरार, नागरिकांमध्ये संताप
अपघात घडल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. भररस्त्यात घडलेल्या या भीषण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. काळेवाडी फाटा परिसरात जड वाहनांची वेगमर्यादा आणि वाहतुकीच्या नियोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (Pimpari chinchwad accident)
यावेळी काळेवाडी फाटा येथे मोठी गर्दी झाली होती. या घटनेची पुढील तपास पोलीस करत आहेत.





