विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन
नाशिक – वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने आज नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक देत लक्ष्मीबाई गायकवाड यांना त्वरित न्याय देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. गायकवाड या बोलठाण (ता. नांदगाव) येथील उपोषणकर्त्या असून, त्यांच्या प्रश्नांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाचा पवित्रा घेतला.
या वेळी महिला आघाडीच्या नाशिक जिल्हा अध्यक्षा उर्मिलाताई गायकवाड यांनी लक्ष्मीबाई गायकवाड यांच्याशी थेट संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ भालेराव, जिल्हा प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, महिला आघाडीच्या नीतूताई सोनकांबळे, उषाताई पगारे, अर्चनाताई गायकवाड, ज्येष्ठ नेते दीपचंद (नाना) दोंदे, तसेच अरुण शेजवळ, भीमचंद चंद्रमोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात, लक्ष्मीबाई गायकवाड यांना तातडीने न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्यांचा विचार करून संबंधित यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.