Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्या!

mosami kewat by mosami kewat
March 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्या!
       
मुंबई : दिल्लीमध्ये मोठे प्रशासकीय बदल करण्यात आले असून देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालपदांवर नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आदेशानंतर या बदलांना अधिकृत मान्यता देण्यात आली.

या फेरबदलांमध्ये महाराष्ट्रालाही नवीन राज्यपाल मिळाले आहेत. जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. मूळचे त्रिपुरा येथील असलेले जिष्णू देव वर्मा आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळतील. त्यांच्या नियुक्तीनंतर तेलंगणाच्या राज्यपालपदी शिव प्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, इतर राज्यांमध्येही राज्यपालपदावर बदल करण्यात आले आहेत. नागालँडच्या राज्यपालपदी नंद किशोर यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांना बिहारचे राज्यपाल म्हणून नेमण्यात आले आहे.

तामिळनाडूचे विद्यमान राज्यपाल आर. एन. रवी यांना पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. केरळचे राज्यपाल राजेंद्र अरळेकर यांच्याकडे हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

याशिवाय, लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीचे उपराज्यपाल वी. कुमार सक्सेना यांना लडाखचे उपराज्यपाल म्हणून नेमण्यात आले असून तरनजीत सिंह सिंधू हे दिल्लीचे नवे उपराज्यपाल असतील.

Tags: Jishnu Dev VarmaMaharashtraPolitical
Previous Post

भारताचा थरारक विजय; टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये सलग दुसरी एंट्री! 

Next Post

भारत अमेरिकेचे 51 वे राज्य आहे का?; तेल खरेदीवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर हल्लाबोल !

Next Post
भारत अमेरिकेचे 51 वे राज्य आहे का?; तेल खरेदीवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर हल्लाबोल !

भारत अमेरिकेचे 51 वे राज्य आहे का?; तेल खरेदीवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर हल्लाबोल !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अकोल्यात चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांची २३३० वी जयंती उत्साहात; समता सैनिक दलाची मानवंदना
बातमी

अकोल्यात चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांची २३३० वी जयंती उत्साहात; समता सैनिक दलाची मानवंदना

by mosami kewat
March 27, 2026
0

अकोला: भारतीय बौद्ध महासभा अकोला शहर शाखा आणि अकोला जिल्हा शाखा, तसेच सर्व तालुका शाखांच्या संयुक्त विद्यमाने अशोक वाटिका, अकोला...

Read moreDetails
हाताने मैला साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जंतर-मंतरवर एल्गार !

हाताने मैला साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जंतर-मंतरवर एल्गार !

March 27, 2026
धर्मांतर, अनुसूचित जाती आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल : वास्तव आणि गैरसमज

धर्मांतर, अनुसूचित जाती आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल : वास्तव आणि गैरसमज

March 27, 2026
Todays Gold Rate : सोन्याची घसरण थांबली! पुन्हा दरवाढीचे सत्र सुरू; पाहा आजचा तोळ्याचा भाव

Todays Gold Rate : सोन्याची घसरण थांबली! पुन्हा दरवाढीचे सत्र सुरू; पाहा आजचा तोळ्याचा भाव

March 27, 2026
BCCIचा बिग प्लॅन; कोहली-रोहित पुन्हा मैदानात, वनडेत रंगणार लढत

BCCIचा बिग प्लॅन; कोहली-रोहित पुन्हा मैदानात, वनडेत रंगणार लढत

March 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home