Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

जालना: पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची जिल्हा बैठक उत्साहात संपन्न

mosami kewat by mosami kewat
October 20, 2025
in Uncategorized
0
जालना: पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची जिल्हा बैठक उत्साहात संपन्न
       

जालना : आगामी पंचायत समिती (PS) आणि जिल्हा परिषद (ZP) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची (VBA) जिल्हास्तरीय बैठक जालना येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाचा प्रभाव वाढवण्यावर आणि उमेदवार निवड प्रक्रियेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या महत्त्वपूर्ण बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रभारी नागोजीराव पांचाळ आणि जिल्हा अध्यक्ष डेविड दादा घुमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये पक्षाचा विस्तार करणे, मतदारांशी संपर्क वाढवणे आणि योग्य उमेदवारांची निवड करून निवडणुकीत अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवण्यावर भर देण्यात आला.

बैठकीदरम्यान जिल्हा प्रभारी नागोजीराव पांचाळ यांनी उपस्थितांना पक्षाच्या धोरणांबद्दल मार्गदर्शन केले आणि आगामी निवडणुकांसाठी सर्व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. तसेच, जिल्हा अध्यक्ष डेविड घुमारे यांनी संघटनात्मक विस्तार आणि जनसंपर्क मोहिमेला गती देण्याचे निर्देश दिले.

या बैठकीला मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोकें, युवा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ लहाने, कार्याध्यक्ष परमेश्वर खरात, जिल्हा महासचिव प्रशांत कजबे, महिला जिल्हाध्यक्षा सौ. रमाताई होरशिळ, ओबीसी नेते रामप्रसाद थोरात, जिल्हा उपाध्यक्ष सतीश खरात व अकबर इनमादार, जिल्हा संघटक राजेंद्र खरात, जिल्हा सचिव राजेंद्र वाजुळे, जिल्हा उपाध्यक्ष शेख लाला, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष प्रकाश पांखरे,

जालना तालुका अध्यक्ष भानदास साळवे, अंबड तालुका अध्यक्ष किशोर तुपे, युवा उपाध्यक्ष हरिष रत्नपारखे, शहर संघटक राहुल रत्नपारखे, तालुका उपाध्यक्ष विलास नरवाडे, तालुका संघटक कैलास जाधव, उपाध्यक्ष गोपाळ गावंडे, बदनापूर तालुका महासचिव दिपक खाजेकर, तालुका सचिव अंकुश गाडेकर, सरपंच अरुण भाऊ गिरी, अंबादास खरात सर यांच्यासह जिल्हा, तालुका, शहर पदाधिकारी, सर्कल निरीक्षक, गण व गट प्रमुख, शाखा प्रमुख आणि असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: ElectionjalnaMaharashtrapoliticsVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

तिवसा: शेतकरी आत्महत्याग्रस्त आठवले कुटुंबियांचे वंचित बहुजन आघाडीकडून सांत्वन; प्रशासनाकडून मदतीची मागणी

Next Post

राहुल मकासरे, विजय वाहूळ व कार्यकर्त्यांवरील ‘खोटे’ गुन्हे मागे घ्या, RSS च्या लोकांवर अॅट्रॉसिटी दाखल करा ; वंचित बहुजन युवा आघाडीची आक्रमक मागणी

Next Post
राहुल मकासरे, विजय वाहूळ व कार्यकर्त्यांवरील ‘खोटे’ गुन्हे मागे घ्या, RSS च्या लोकांवर अॅट्रॉसिटी दाखल करा ; वंचित बहुजन युवा आघाडीची आक्रमक मागणी

राहुल मकासरे, विजय वाहूळ व कार्यकर्त्यांवरील 'खोटे' गुन्हे मागे घ्या, RSS च्या लोकांवर अॅट्रॉसिटी दाखल करा ; वंचित बहुजन युवा आघाडीची आक्रमक मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मोहनराव पाटील यांचा राष्ट्रवादीला (शरद पवार गट) मोठा झटका! कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
बातमी

मोहनराव पाटील यांचा राष्ट्रवादीला (शरद पवार गट) मोठा झटका! कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

by mosami kewat
November 12, 2025
0

मलकापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) मलकापूर विधानसभा अध्यक्ष मोहनराव पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीमध्ये...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी कन्नड नगरपरिषदेच्या सर्व जागा लढवणार; उपसरपंचांसह अनेकांचा पक्षात प्रवेश

वंचित बहुजन आघाडी कन्नड नगरपरिषदेच्या सर्व जागा लढवणार; उपसरपंचांसह अनेकांचा पक्षात प्रवेश

November 12, 2025
Beed : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वंचित परिवर्तन घडवणार – किरण वाघमारे

Beed : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वंचित परिवर्तन घडवणार – किरण वाघमारे

November 11, 2025
नांदेड मध्ये कॉंग्रेस – वंचित बहुजन आघाडी एकत्र : 50- 50 च्या आधारावर आघाडीची घोषणा

नांदेड मध्ये कॉंग्रेस – वंचित बहुजन आघाडी एकत्र : 50- 50 च्या आधारावर आघाडीची घोषणा

November 11, 2025
दिल्ली स्फोटप्रकरणी ॲड. प्रकाश आंबेडकरांची 'संघा'वर गंभीर शंका; 'इंटर्नल' स्फोटांची सखोल चौकशी करण्याची मागणी

दिल्ली स्फोटप्रकरणी ॲड. प्रकाश आंबेडकरांची ‘संघा’वर गंभीर शंका; ‘इंटर्नल’ स्फोटांची सखोल चौकशी करण्याची मागणी

November 11, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home