Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जालना: वंचितच्या पाठपुराव्याला यश; घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते आठवड्यात जमा होणार

mosami kewat by mosami kewat
February 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
जालना: वंचितच्या पाठपुराव्याला यश; घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते आठवड्यात जमा होणार

जालना: वंचितच्या पाठपुराव्याला यश; घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते आठवड्यात जमा होणार

       

जालना: प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल यांसह विविध घरकुल योजनांचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे रखडल्याने लाभार्थी हवालदिल झाले होते. या गंभीर प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेत जालना पंचायत समिती प्रशासनाकडे धाव घेतली. वंचितच्या या पाठपुराव्याला यश आले असून, प्रशासनाने रखडलेले हप्ते तात्काळ जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच कामाला गती देण्यासाठी सेवली व नेर सर्कलसाठी स्वतंत्र अभियंत्यांची नेमणूक देखील करण्यात आली आहे.

घरकुलांच्या प्रलंबित हप्त्यांबाबत वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जालना पंचायत समितीचे कार्यालयीन अधीक्षक कपे आणि आस्थापना शाखा वरिष्ठ सहाय्यक ए.व्ही. मोहड यांची भेट घेतली. या चर्चेनंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत घरकुल शाखाचे वाघ, गृहनिर्माण अभियंता पाटील, शेख,बुनगे, इंदलकर, जाधव यांचा संपर्क साधत तातडीने घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि सेवली सर्कल साठी गृहनिर्माण अभियंता पाटील व नेर सर्कल साठी बुनगे यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आल. रखडलेले सर्व हप्ते येत्या एक आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील, अशी ग्वाही मोहड यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके म्हणाले की, गोरगरीब लाभार्थ्यांचे हप्ते रखडल्याने अनेकांची बांधकामे अर्धवट स्थितीत आहेत. जर येत्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत, तर गट विकास अधिकारी संदीप पवार यांना घेराव घालून तीव्र आंदोलन करण्यात येईल. या प्रसंगी जिल्हा संघटक राजेंद्र खरात, ॲड. हर्षवर्धन प्रधान, तालुकाध्यक्ष भानुदास साळवे, राजेंद्र वांजुळे, राजरत्न अचलखांब, संजय आदमाने, शत्रुघ्न कोळी, गणेश वाहूले, भगवान गोरे, गौतम पाडमुख, अनिल डोके, प्रताप पटेकर, संपत प्रधान, रतन कांबळे, रोहिदास लोंढे, मनोहर मोहिते यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: beneficiariesGovernmentSchemesHousingSchemejalnaLocalPoliticsMaharashtraPanchayatSamitiPMAYPradhanMantriAwasYojanaPublicAdministrationRamaiAwasYojanaRuralDevelopmentSocialJusticevanchitbahujanaghadi
Previous Post

मराठीला अभिजात दर्जा, पण शाळांना टाळे; २५५ शाळा बंद झाल्याने ग्रामीण शिक्षण धोक्यात!

Next Post

अल्पवयीन गोसावी समाजातील मुलगी बेपत्ता; तात्काळ शोधासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रशासनाला निवेदन

Next Post
अल्पवयीन गोसावी समाजातील मुलगी बेपत्ता; तात्काळ शोधासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रशासनाला निवेदन

अल्पवयीन गोसावी समाजातील मुलगी बेपत्ता; तात्काळ शोधासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रशासनाला निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर
बातमी

भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर

by mosami kewat
April 12, 2026
0

Pune : भीम जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या सादरीकरणात होत असलेल्या विकृतीकरणाबाबत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात...

Read moreDetails
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

April 12, 2026
यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

April 12, 2026
परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

April 11, 2026
शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

Akola : शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

April 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home