जालना : नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा जालना जिल्हा समन्वयक सविता मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील संघटनात्मक तयारी, उमेदवार निवड प्रक्रिया, प्रचाराची आखणी आणि जनसंपर्क वाढविण्याबाबत मुद्देसूद मार्गदर्शन करण्यात आले.
बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट; संबंधित फेसबुक पेज आयडी बंद करून गुन्हे दाखल करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी
या बैठकीस जालना पूर्व जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, जालना पश्चिम जिल्हाध्यक्ष रामप्रसाद थोरात तसेच नागोराव पांचाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेते यांनी या बैठकीत उत्साहाने सहभाग घेतला.
सविता मुंडे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका या वंचित, बहुजन, मागास समाजाच्या सत्तेतील प्रतिनिधित्वासाठी निर्णायक ठरणार आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात जाऊन लोकांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवावी.”






