जळगाव : महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला आहे. जळगाव पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर म्होरक्याला तामिळनाडूतून अटक केली आहे. या कारवाईमध्ये सुमारे ६५ कोटी रुपयांचे एम्फेटामाइन नावाचे सिंथेटिक ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
अंमली पदार्थांचा आंतरराष्ट्रीय तस्करीचा मार्ग उघडकीस
चाळीसगाव पोलिसांनी २४ जुलै रोजी रात्रीच्या नियमित नाकाबंदीदरम्यान एका संशयित कारला (DL 09, CB 7771) बोढरे फाट्याजवळ अडवले. तपासणी केल्यावर कारच्या डिक्कीमध्ये एका सुटकेसमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडले. पोलिसांनी तात्काळ कार चालक अब्दुल आसिम अब्दुल आला सय्यद (वय ४८, रा. न्यू फ्रेंड्स कॉलनी, दिल्ली) याला अटक केली.
पोलिसांनी जप्त केलेल्या या अंमली पदार्थाची किंमत सुमारे ६४ कोटी ९८ लाख रुपये असून, ते एम्फेटामाइन नावाचे सिंथेटिक ड्रग्ज असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अधिक तपास केला असता, हा अंमली पदार्थांचा साठा दिल्लीतून हरियाणा, मध्यप्रदेशमार्गे महाराष्ट्रातील चोपडा-चाळीसगाव- औरंगाबाद असा प्रवास करून तामिळनाडू आणि तिथून श्रीलंकेत पाठवला जात होता, अशी माहिती उघड झाली आहे.
तमिळनाडूतील मुख्य सूत्रधार अटकेत
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी चार विशेष पथके दिल्ली, बंगळूर, मध्यप्रदेश आणि तामिळनाडूला पाठवली. या पथकांनी सतत तपास करून तामिळनाडूमध्ये लपून बसलेल्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला शोधून काढले.
पोलिसांनी २८ जुलै रोजी तामिळनाडूतील नागापट्टम येथून महालिंगम नटराजन (वय ६२, रा. विंलुदामावडी, नागापट्टम, तामिळनाडू) याला ताब्यात घेतले. त्याला चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचे एक मोठे रॅकेट उध्वस्त झाले आहे.
क्रांतीलढ्यातील वैचारिक रागिणी!
- धनाजी कांबळे गौतम बुद्ध यांनी मांडलेल्या मानवमुक्तीच्या विचारांपासून ते मार्क्स, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या जीवनाच्या सिद्धांतापर्यंतच्या मांडणीत हस्तेक्षेप करीत...
Read moreDetails