Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

हॉकीचा सुवर्ण तारा निखळला! मॉस्को ऑलिम्पिकचे नायक दविंदर सिंह गरचा यांचे निधन

mosami kewat by mosami kewat
January 11, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
हॉकीचा सुवर्ण तारा निखळला! मॉस्को ऑलिम्पिकचे नायक दविंदर सिंह गरचा यांचे निधन
       
भारतीय क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे. १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकीला सुवर्ण झळाळी मिळवून देण्यात मोलाचा वाटा देणारे दिग्गज हॉकीपटू दविंदर सिंह गरचा यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जालंधर येथील राहत्या घरी शनिवारी त्यांची प्राणज्योत मावळली.

अमृतसरमध्ये ७ डिसेंबर १९५२ रोजी  दविंदर सिंह यांचा जन्म झाला. त्यांनी १९७९ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले आणि अत्यंत कमी वेळात आपली छाप सोडली. १९८० च्या ऐतिहासिक मॉस्को ऑलिम्पिकमध्ये त्यांनी केवळ ६ सामन्यांत ८ गोल डागत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता.

त्यांच्याच धडाकेबाज कामगिरीमुळे भारताने स्पेनला पराभूत करून आठव्यांदा ऑलिम्पिक सुवर्णपदकावर नाव कोरले होते. दविंदर सिंह गरचा हे केवळ मैदानावरच नव्हे, तर प्रशासकीय सेवेतही तितकेच तत्पर होते. त्यांनी ३० आंतरराष्ट्रीय सामन्यांत १९ गोल नोंदवले.

दविंदर सिंह गरचा यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी २०२१ मध्ये ‘ध्यानचंद पुरस्काराने’ गौरविण्यात आले होते. हॉकीच्या मैदानानंतर त्यांनी पोलीस दलातही आपली सेवा दिली. ते पंजाब पोलीस खात्यात पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) पदावरून निवृत्त झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी छातीत वेदना होत असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरीही सोडण्यात आले होते, मात्र शनिवारी सकाळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि भारतीय हॉकीचा हा ‘सुवर्ण योद्धा’ काळाच्या पडद्याआड गेला.

दविंदर सिंह यांच्या निधनाने भारतीय हॉकीने एक असा खेळाडू गमावला आहे, ज्याने देशाचा तिरंगा जागतिक स्तरावर अभिमानाने फडकवला. 

Tags: ElectionElection campaigElection newsMaharashtraVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

वसई-विरारमध्ये सुजात आंबेडकरांची गर्जना; वसई-विरारच्या विकासासाठी वंचितला संधी द्या; सुजात आंबेडकरांचे मतदारांना आवाहन

Next Post

अदानींशी झालेला धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा फेरविचार करू – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
अदानींशी झालेला धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा फेरविचार करू – ॲड. प्रकाश आंबेडकर

अदानींशी झालेला धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा फेरविचार करू - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा यांचे पुण्यात निधन; साहित्य क्षेत्रावर शोककळा
बातमी

ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा यांचे पुण्यात निधन; साहित्य क्षेत्रावर शोककळा

by mosami kewat
January 11, 2026
0

पुणे: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध विचारवंत आणि प्रख्यात संशोधक आचार्य रतनलाल सोनग्रा (८७) यांचे रविवारी...

Read moreDetails
अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘वंचित’चा प्रचार जोरात; प्रा. अंजलीताई आंबेडकरांच्या सभेला मोठी गर्दी

अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘वंचित’चा प्रचार जोरात; प्रा. अंजलीताई आंबेडकरांच्या सभेला मोठी गर्दी

January 11, 2026
अदानींशी झालेला धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा फेरविचार करू – ॲड. प्रकाश आंबेडकर

अदानींशी झालेला धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा फेरविचार करू – ॲड. प्रकाश आंबेडकर

January 11, 2026
हॉकीचा सुवर्ण तारा निखळला! मॉस्को ऑलिम्पिकचे नायक दविंदर सिंह गरचा यांचे निधन

हॉकीचा सुवर्ण तारा निखळला! मॉस्को ऑलिम्पिकचे नायक दविंदर सिंह गरचा यांचे निधन

January 11, 2026
वसई-विरारमध्ये सुजात आंबेडकरांची गर्जना; वसई-विरारच्या विकासासाठी वंचितला संधी द्या; सुजात आंबेडकरांचे मतदारांना आवाहन

वसई-विरारमध्ये सुजात आंबेडकरांची गर्जना; वसई-विरारच्या विकासासाठी वंचितला संधी द्या; सुजात आंबेडकरांचे मतदारांना आवाहन

January 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home