सोलापूर : पाच दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे हिप्परगा तलाव पूर्णपणे भरला आहे. तलावाच्या उजव्या आणि डाव्या बाजूच्या सांडव्यांमधून ६०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे तलावाजवळील १० ते १५ घरांमध्ये पाणी शिरले आहे.
सांडव्यांमधून पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे आदीला नदी आणि देगाव नाल्याला पूर आला आहे. या पुराच्या पाण्याने जुना पुना नाका परिसराला वेढा घातला आहे. तसेच, शेळगी नाला ओव्हरफ्लो झाल्यामुळे सोलापूर-तुळजापूर महामार्गावरही पाणी आले आहे.
बुधवारी पहाटेपासून धाराशिव, तुळजापूर आणि जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाचा फटका सोलापूरला बसत आहे. मार्डी, बाणेगाव आणि इतर अनेक लहान-मोठ्या ओढ्यांमधून वाहणाऱ्या पाण्यामुळे हिप्परगा तलाव पूर्ण भरला आणि त्यातून पाण्याचा प्रवाह वाढला. पाटबंधारे विभागाने महापालिकेला पत्र पाठवून सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नाला वळविल्याने घरांमध्ये शिरले पाणी
अवंतीनगर येथील जुन्या बाराकमानीजवळ ब्रिटिशकालीन रेल्वे पुलाजवळ आदीला नदी आणि शेळगी नाला एकत्र येतात. पण शेळगी नाला वळवून तो आदीला नदीला जोडण्यात आला आहे. मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक नाल्याचा मार्ग बदलला आणि पुलाच्या दुसऱ्या बाजूचा नैसर्गिक नाला बुजवून तिथे घरे बांधण्यात आली आहेत. यामुळे पाण्याचा प्रवाह कमी झाला आणि त्याची क्षमताही घटली. यामुळे पाऊस वाढल्यावर हिप्परगा तलावातील पाणी वाढते आणि जुना पुना नाला, वसंत विहार, अवंतीनगर, गणेशनगर या भागांमध्ये पाणी शिरते, ज्यामुळे लोकवस्तीला पुराचा धोका निर्माण होतो.
वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न
लातूर : वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारिणी, रेणापूरची महत्त्वपूर्ण बैठक तक्षशिला बुद्ध विहार, घनसारगाव येथे पार पडली. या बैठकीत सदस्य...
Read moreDetails