अकोला :सावित्रीबाई फुले जयंती दिवशी अकोल्यात व्यापक गर्भाशय कर्करोग निदान कार्यक्रमाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या, प्रा.अंजली आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
अकोला जिल्हा परिषद ,सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र, आय आय एम, अकोला आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भाशय कर्करोग निदान शिबिराचे आयोजन संपूर्ण अकोला जिल्ह्यात आयोजित करण्यात आले.
अकोला जिल्ह्यातील सर्व उप आरोग्य केंद्रांमध्ये ही तपासणी ३ जानेवरी ते २२ जानेवारी दरम्यान होणार आहे. ह्या प्राथमिक तपासणीतून निघालेल्या संभाव्य केसेस पेप स्मियर चाचणी साठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविलेल्या जातील. जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हाभर गर्भाशय कर्करोग निदान चाचणी एका महिन्यात उपकेंद्राच्या स्तरावर राबविण्याचा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग आहे.
डॉ चांडक, (आय आय एम-अकोला) , डॉ वारे (जिल्हा स्त्री रुग्णालय), श्रीमती वैष्णवी, संगीता अढाऊ, माया नाईक, डॉ गाढवे, आरोग्य समिती सदस्य (अकोला जिल्हा परिषद), डॉ मालोकार, अरुंधती शिरसाट (वंचित बहुजन आघाडी) यांनी ह्यात विशेष पुढाकार घेतला.
सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त महिलांनी ह्या उपक्रमाचा लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रा. अंजली आंबेडकर यांनी उद्घाटन प्रसंगी केले.