Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘बार्टी’ चं हे चाललंय काय ?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 3, 2024
in बातमी
0
‘बार्टी’ चं हे चाललंय काय ?
       

वंचित युवा आघाडी राज्य सरकारला उच्च न्यायालयात खेचणार – राजेंद्र पातोडे

पुणे: संशोधक विद्यार्थ्याची मोठी फसवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे येथील अधिकारी तसेच मंत्रालयात बसलेल्या सुमंत भांगे नावाचे सचिव दर्जाच्या अधिकारी ह्यांनी चालवली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे ह्यांनी काढले होते.त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधक अधिछात्रवृत्ती (BANRF) -२०२२ साठी दिनांक १० जानेवारी रोजी होणारी चाळणी परीक्षा रद्द करण्यात येत आहे असे जाहीर करण्यात आले होते.मात्र आज मंत्रालयात झालेल्या बैठकी नंतर आज हा निर्णय फिरण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI यांच्याशी समान धोरणाच्या अनुषंगाने सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता घेतली नसल्याने तो निर्णय मागे येत आहे. तरी ठरलेल्या तारखेलाच परीक्षा होणार आहे याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी असे बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी जाहीर केले असल्याची माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे यांनी दिली.

मुळात प्रचलित पद्धतीनुसार विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षेद्वारे पीएच. डी.साठीचे प्रवेश देतात किंवा आतापर्यंतच्या नियमांनुसार पदव्युत्तर पदवी मिळाल्यानंतर, विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा, एमफिल आणि नेट-सेट परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखत देऊन, पीएच. डी.ला प्रवेश मिळवता येत होता. मात्र, नव्या शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांचा आणि आठ सत्रांचा पदवी अभ्यासक्रम किमान ७५ टक्के गुणांसह किंवा पदवीनंतर एक वर्षाचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पीएच. डी.ला प्रवेश घेता येते असा नियम २०२२ मध्ये युजीसी ने केला. पी. एचडी साठी पात्र होण्यासाठी NET, SET, PET या परीक्षा पात्र झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना पीएचडी साठी पात्र ठरतात व त्यानंतर पात्र संशोधक विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात येतात मुलाखतीनंतर पात्र विद्यार्थ्यांकडून संशोधन अहवाल मागवण्यात येतो व तो अहवाल विद्यापीठाच्या scrutinized committee पाठवण्यात येतो scrutinized committee च्या मान्यतेनंतरच संशोधक विद्यार्थ्यांचे final admission होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

बार्टी, सारथी, महाज्योती ह्या तिन्ही संस्था मध्ये चाळणी परीक्षा हे थोतांड सुरू केले आहे.बार्टी, सारथी आणि महाज्योती या फेलोशिपसाठी राज्य सरकारने परीक्षा घेतली असून, राज्यभरात ही परीक्षा झाली होती.२०१९ च्या परीक्षेसाठी तयार करण्यात आलेली प्रश्नपत्रिका पुन्हा २०२३ च्या परीक्षेत विध्यार्थ्यांना देण्यात आली. विशेष म्हणजे २०१९ च्या पेपरची जशाच तशी कॉपी करण्यात आली आहे. अगदी प्रश्न आणि प्रश्नांचा क्रम सुद्धा तोच होता.२०१९ मध्ये सेटसाठी जी परीक्षा घेण्यात आली होती, तोच पेपर २०२३च्या या फेलोशिपच्या परीक्षेसाठी वापरण्यात आला होता. त्यावर कुठलीही कार्यवाही न करता पुन्हा नव्याने परीक्षा घेण्याचा घाट घातला गेला असून युवा आघाडीने सरकारला न्यायालयात खेचण्याची प्रक्रिया सुरू केली असून बार्टी, सारथी, महाज्योती ह्या तिन्ही संस्था मध्ये सुसूत्रीकरण नावावर सुरू असलेले गैरप्रकार आणि मनमानी खपवून घेणार नाही असा इशारा देखील राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला आहे.

युवा आघाडीचे पदाधिकारी ॲड अफरोज मुल्ला हे जनहित याचिका तयार करणार असून युवा आघाडीचे विशाल गवळी, ऋषीकेश नांगरे पाटील तसेच पुणे युवा अध्यक्ष सोमनाथ पानगावे, महासचिव शुभम चव्हाण आणि पिंपरी चिंचवड युवा अध्यक्ष नितीन गवळी व टीम कामाला लागली आहे.


       
Tags: #barti_fellowshipBARTIMaharashtraVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात ‘विजयस्तंभ’ अभिवादनासाठी धावल्या हजारो दुचाकी !

Next Post

‘वंचित’ च्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकरांच्या हस्ते गर्भाशय कर्करोग निदान कार्यक्रमाचे उद्घाटन !

Next Post
‘वंचित’ च्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकरांच्या हस्ते गर्भाशय कर्करोग निदान  कार्यक्रमाचे  उद्घाटन  !

'वंचित' च्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकरांच्या हस्ते गर्भाशय कर्करोग निदान कार्यक्रमाचे उद्घाटन !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
युवा समिती धनगर समाजाच्या युवकांचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा
बातमी

युवा समिती धनगर समाजाच्या युवकांचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा

by mosami kewat
November 16, 2025
0

अकोला : अकोला येथील सर्किट हाऊस येथे युवा समिती धनगर समाजाच्या वतीने गाव प्रमुखांची महत्वपूर्ण एल्गार बैठक पार पडली. समाजातील...

Read moreDetails
गजानन एकबोटे यांनी प्रा. दिलीप चव्हाण यांचा लेख चोरला?

गजानन एकबोटे यांनी प्रा. दिलीप चव्हाण यांचा लेख चोरला?

November 16, 2025
वर्धा हिंदी विद्यापीठात बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यास मनाई; RSS शाखेला मात्र परवानगी!

वर्धा हिंदी विद्यापीठात बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यास मनाई; RSS शाखेला मात्र परवानगी!

November 16, 2025
बुलढाण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी–काँग्रेसची युती; ५०-५० जागावाटप निश्चित

बुलढाण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी–काँग्रेसची युती; ५०-५० जागावाटप निश्चित

November 16, 2025
ठाण्यात २.२५ कोटींचे ड्रग्ज जप्त! मध्यप्रदेशातून आलेल्या ४ तस्करांना अटक

ठाण्यात २.२५ कोटींचे ड्रग्ज जप्त! मध्यप्रदेशातून आलेल्या ४ तस्करांना अटक

November 16, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home