ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे पंतप्रधानांना पत्र
मुंबई : एससी, एसटी कर्मचाऱ्यांबाबत पदोन्नतीतील आरक्षणाची अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. याबाबत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
ॲड. आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातीच्या (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी कलम 16(4 A) आणि अनुच्छेदमधील कलम 16(4) B नुसार केंद्र सरकारमधील पदोन्नतीतील आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मुद्दा पीएमओ कार्यालयाकडे पत्राद्वारे उपस्थित केला आहे.
हे पत्र 18 जुलै रोजी पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) ई-मेल करण्यात आले आहे. केंद्र सरकारमध्ये SC आणि ST कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीतील आरक्षणाची अंमलबजावणी न होणे ही गंभीर आणि चिंतेची बाब असल्याचेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधानांनी यात हस्तक्षेप करून एससी, एसटी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये जे आरक्षण द्यायला हवे, त्याची अंमलबजावणी करण्याची विनंती आंबेडकर यांनी केली आहे.