अकोला : बीजेपी निवडून आल्यास कोणतीच निवडणूक होणार नाही, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. रिसोड तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे ॲड. आंबेडकर यांच्या उपस्थितीत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
जर पुन्हा बीजेपी निवडून आली तर पुढच्या निवडणुका होणार नाहीत. मग त्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायती असुद्या, यातील कुठल्याही निवडणुका होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तुम्हाला जर ग्रामपंचायतीची निवडणूक नको असेल तर मोदीला मतदान करा, जर तुम्हाला ग्रामपंचायत पाहिजे असेल तर प्रेशर कुकरला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.
उन असेल तर सकाळी मतदान करून आपल्या मतदानाचा टक्का वाढवावा. टक्का वाढला तर आपला विजय निश्चित आहे. असे त्यांनी म्हटले आहे.