पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात आज मोठ्या उत्साहात वंचित बहुजन आघाडीचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून पक्ष बळकटीस हातभार लावला.
या पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ऍड. अरविंद तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रवेशासाठी विधानसभा उपाध्यक्ष साजन सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले.
आगामी निवडणूकित वंचितच्या विजयासाठी सज्ज व्हा – डॉ. धैर्यवर्धन पुंडकर
कार्यक्रमाच्या वेळी शहर सचिव प्रा. बी. पी. सावळे, शहर संघटक सतीश रनवरे, योगेश राजापूरकर, राकेश धोत्रे, परेश शिरसंगे, गोपाळ वाघमारे, धर्मराज कदम, विधानसभा अध्यक्ष प्रभाकर सरोदे, महासचिव दीपक रोकडे, तसेच महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्षा त्रिशला गायकवाड, उषाताई भिंगारे, प्रतिमा कांबळे, आणि प्रवीण डोळस, मिलिंद खरात, रितेश मृदूंगे, प्रवीण बागुल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या पक्ष प्रवेशामुळे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद अधिक वाढली असून, आगामी निवडणुकांसाठी हा प्रवेश पक्षाला बळ देणारा ठरणार आहे.





