जिंतूर : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिंतूर तालुक्यामधील शेकडो मुस्लिम युवकांनी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा जिंतूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष मुझफ्फर खान यांच्या नेतृत्वाखाली या मुस्लिम युवकांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तुकाराम भरती यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर गणेश गाढे (युवा जिल्हा अध्यक्ष, उत्तर), तुषार गायकवाड (युवा जिल्हा अध्यक्ष, दक्षिण), युसूफ कलीम (जिल्हा सचिव, वंचित बहुजन आघाडी) आणि शिवाजी वाकडे यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या पक्षप्रवेशामुळे जिंतूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद आणखी वाढली असून, आगामी काळात पक्षाच्या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे-बारामतीत ED ची धडक! 108 कोटींच्या अपहार प्रकरणी फरार आनंद लोखंडेच्या मालमत्तांवर छापे; राजकीय कनेक्शनची चर्चा
पुणे : गेल्या काही दिवसांपासून सक्रिय असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज पुणे आणि बारामती जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई केली आहे. विद्यानंद...
Read moreDetails






