नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नवी मुंबई नेरूळ येथे आयोजित सत्ता परिवर्तन महासभेत विविध पक्ष संघटनांच्या शेकडो नेत्यांनी वंचितमध्ये पक्ष प्रवेश केला.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत अनेकांनी पक्ष प्रवेश केला. या वेळी सत्ता परिवर्तन महासभेला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. त्याचप्रमाणे सर्व जाती धर्माचे नेते मंचावर उपस्थित होते.

या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षातून जगदीश घरत, नासिर रशिद शेख, पवन निखाडे, राहुल चव्हाण, अविनाश अडागळे, अमन मंगवना, दिनेश साळवे, जितेंद्र काबंळे, विनय मोरे, अबु बाखर नाखवा, अरबाज शेख, गणपत शेलार, सुशील मोरे आणि किरण ठाकरे यांनी वंचितमध्ये प्रवेश केला. तसेच, मुस्लिम समाजातील नेते मोहम्मद फैजल शेख, शेख शहाबुद्दीन सिद्दीकी, नसिर खान, खालीद भाई यांनी वंचितमध्ये पक्ष प्रवेश केला. खाटीक समाजाचे नेते शमसुद्दीन मोमीन, सर्वर खान तसेच, आदिवासी समाजाचे नेते ॲड. सुनील टोटावाड, संपत वळवी, लक्ष्मण मुठे, अमोल भालेकर या सर्व आदिवासी नेत्यांनीही वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्ष प्रवेश केला. याबरोबर मारवाडी समाज, मातंग समाजातील नेत्यांनीही पक्ष प्रवेश केला.

सत्ता परिवर्तन आवश्यक
देशात सध्या हुकूमशाहीची राजवट आली आहे. ती बदलायची असेल तर सत्ता परिवर्तन करणे आवश्यक आहे. देशातील तरुण दिशाहीन झाला आहे. त्यामुळे परिवर्तन होणे गरजेचे आहे. तसेच, तरुणांच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन असणे आवश्यक आहे. ते मार्गदर्शन सध्या ॲड. प्रकाश आंबेडकरच करु शकतात असा विश्वास ॲड. सुनील टोटावाड यांनी व्यक्त केला.