महापालिकेचा निषेध : अधिकाऱ्यांची मनमानी बंद करा
अकोला : वाईट शक्तींना जाळून होळीचा सण साजरा करण्याची परंपरा आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अशाच चुकीच्या पाणीपट्टी देयकांची सीव्हिल लाईन चौक येथे ७ वाजता होळी करुन अकोला महानगरपालिकेविरोधात निषेध करण्यात आला. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अकोला शहरात महानगरपालिकेने नागरिकांच्या घरगुती नळ कनेक्शनवर मीटर बसविले आहे. या मीटरचे रीडिंग घेऊन नागरिकांना वेळेवर देयके देण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची होती. परंतु, संबंधित कंत्राटदारांकडून कुठे वर्षभर तर कुठे सहा महिने रीडिंग घेतले गेले नाही. तर काही भागात कधीच रीडिंग घेतले गेले नसल्याची माहिती नागरिकांनी दिली.
तसेच, काही ठिकाणी अवैध नळ कनेक्शन देण्यात आले आहे. त्यावर प्रशासन कधी कारवाई करणार? असा सवाल नागरिकांनी विचारला असून, महापालिका प्रशासन या महत्वाच्या बाबींकडे लक्ष देत नाही.
तसेच, नळावरील मीटरची देयके आणि मीटरचे रीडिंग याचे कुठेही, कसलेही तारतम्य लागत नसल्याने मनाला वाटेल ते आकडे टाकले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबरोबर जे कंत्राटदार देयके वाटत आहेत, ते राजकीय लोकांच्या मर्जीतले व निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कंत्राटदाराकडून मनमानी पद्धतीने देयके वाटून ती वसूल करण्यासाठी प्रक्रिया पार पाडली जात आहे. काही ठिकाणी देयके भरली नाहीत म्हणून नळ जोडण्या तोडण्यात आल्या आहेत.
याबाबत महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी अनेक सभांमध्ये तक्रारी केल्या, आवाज उठविला. तसेच, वंचित बहुजन आघाडीने या मनमानी विरोधात अनेक वेळा निवेदने दिली. परंतु, त्याचा काही फायदा झाला नाही. शहरात अजूनही पाणीपट्टी देयकांची मनमानी सुरुच आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाणीपट्टी देयकांची होळी करुन प्रशासनाचा निषेध केला.
या वेळी पार्लेंमेंट बोर्ड सदस्य अशोकभाऊ सोनोने, प्रदेश प्रवक्ते राजेंद्रभाऊ पातोडे, महीला आघाडी प्रदेश महासचिव अरुंधतीताई शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महीला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, पूर्व महानगर अध्यक्ष शंकरराव इंगळे, पश्चिम कार्याध्यक्ष मजहर खान, महीला आघाडी महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, शहर संघटक निलेश देव, पश्चिम महानगर महासचिव गजानन गवई, जि प सभापती आम्रपालीताई खंडारे, ॲड संतोष रहाटे, मनोहर बनसोड, सचिन शिराळे,डॉ.मेश्राम, अशोक शिरसाट, सुरेश शिरसाट, आकाश गवई,कीशोर मानवटकर, राजू बोदडे, रितेश यादव, वैभव खडसे, नागेश उमाळे, आकाश जंजाळ, सुनिल शिराळे, आशिष सोनोने, शंकर इंगोले, सुवर्णा जाधव, संगीताताई खंडारे, नितेश किर्तक, ॲड आकाश भगत, चिकु वानखडे, रंजीत वाघ, राजेश मोरे, नितीन सपकाळ, सुनिल पाटील, राजेश पाटसुळकर, किशोर जामनिक, प्रदीप शिरसाट, सुनील शिरसाट, निखिल गजभिये, आनंद खंडारे, शिलवंत शिरसाट, राजेश बुधावने आदींसह नागरिक देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.