Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

चोरीच्या खोट्या आरोपावरुन तीन तरुणांना बेदम मारहाण

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 25, 2024
in राजकीय
0
चोरीच्या खोट्या आरोपावरुन तीन तरुणांना बेदम मारहाण
       

वंचितने घेतली अधिकाऱ्यांची भेट : भटक्या विमुक्त समाजातील तरुणांवरील गुन्हे मागे घ्या

वैजापूर :  चोरीच्या खोट्या आरोपावरुन सागर वाघडकर यांच्यावर ग्रामीण पोलिस स्टेशन वैजापूर येथे २२ मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भटक्या समाजातील सागर वाघडकर, बजरंग गरड आणि किरण गजर या तीन तरुणांवर चोरीचा खोटा आरोप ठेवून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.

माणुसकीला काळिमा फासणारे हे कृत्य असून, क्रूर माणसांच्या समूहांनी या तिघांनी चोरी केल्याचे कबूल करावे म्हणून सकाळी 10 पासून  सायंकाळी 5 वाजेपर्यंत गोडाऊनच्या शटरमध्ये कोंडून ठेवले. तसेच त्यांना जीव मारण्याची धमकी देत बेदम मारहाण करण्यात आली.

राईन पाड्यासारखे कुठलीही विचारपूस न करता त्यांचे ओळखपत्र न बघता त्यांची शहानिशा न करता भटका समाज अजूनही क्रूर माणसांची शिकार बनत आहे.  या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी पोलिस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांची भेट घेऊन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच निरपराध तरुणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ.अरुण जाधव, सखाराम शिणगारे, जाकिर पठाण, अंकुश पठारे, अरुण सोनवणे, सुदाम  पाटील, दौलत पाटील, काशिनाथ वायकर, नारायण गदाई पाटील, संतोष चव्हाण यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

या प्रसंगी पोलीस निरीक्षक कौटाळे यांनी सखोल तपास करून कोणावरही अन्याय होणार नाही, असे काम केले जाईल अशी हमी भटक्या विमुक्ताच्या शिष्टमंडळास दिली आहे.


       
Tags: Arun JadhavvaijapurVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचितकडून चुकीच्या पाणीपट्टी देयकांची होळी

Next Post

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून 9 उमेदवार जाहीर !

Next Post
लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून 9 उमेदवार जाहीर !

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून 9 उमेदवार जाहीर !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
OBC क्रिमी लेयर ठरवताना केवळ पालकांचे उत्पन्न निकष ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !
बातमी

OBC क्रिमी लेयर ठरवताना केवळ पालकांचे उत्पन्न निकष ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

by mosami kewat
March 12, 2026
0

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय दिला आहे. एखादा उमेदवार क्रिमी लेयरमध्ये...

Read moreDetails
Bigg Boss 19 Winner: ५० लाख आणि कार अजूनही मिळेना? गौरव खन्नाचा खळबळजनक खुलासा!

Bigg Boss 19 Winner: ५० लाख आणि कार अजूनही मिळेना? गौरव खन्नाचा खळबळजनक खुलासा!

March 12, 2026
खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-२

खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-२

March 12, 2026
इराण युध्दात ट्रम्प तात्या पुन्हा एकदा "चिकन आऊट" होतील काय ?

इराण युध्दात ट्रम्प तात्या पुन्हा एकदा “चिकन आऊट” होतील काय ?

March 12, 2026
ICC T20 Ranking: टी-२० वर्ल्ड कपनंतर आयसीसी रँकिंग जाहीर; संजू सॅमसनची ऐतिहासिक झेप

ICC T20 Ranking: टी-२० वर्ल्ड कपनंतर आयसीसी रँकिंग जाहीर; संजू सॅमसनची ऐतिहासिक झेप

March 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home