Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

हिंगोलीत भरारी पथकाची मोठी कारवाई; मतदानापूर्वी १ कोटी रुपये पकडले, महाराष्ट्रात खळबळ

mosami kewat by mosami kewat
December 1, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
हिंगोलीत भरारी पथकाची मोठी कारवाई; मतदानापूर्वी १ कोटी रुपये पकडले, महाराष्ट्रात खळबळ
       
हिंगोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानाला केवळ काही तास शिल्लक असताना, हिंगोली शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या महाराष्ट्रात निवडणुकीमुळे सर्वत्र जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा मत मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर केला जात आहे.

मंगळवारी (२ डिसेंबर) होणाऱ्या नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, हिंगोली पोलिसांनी शेतकरी भवन परिसरात मोठी कारवाई केली आहे. यामुळे हिंगोली शहरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या भरारी पथकाने टाटा नेक्सन कारमधून तब्बल एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. नोटांच्या बंडलांमध्ये १००, २००, ५०० आणि ५० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे.

निवडणूक विभागाने मतदानापूर्वी प्रचाराचा वाढीव वेळ दिल्याने पोलीस आणि भरारी पथके शहरात अधिक सतर्क झाली होती. तपासणीदरम्यान ही मोठी रक्कम हाती लागली.

व्यापाऱ्याचा दावा, चौकशी सुरूजप्त केलेली ही रक्कम एका खासगी व्यापाऱ्याची असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. संबंधित व्यक्तीने रक्कम बाळगण्याची परवानगी असल्याचा दावा केला आहे.

मात्र, निवडणूक विभागाने ही रोकड पडताळणी आणि प्राथमिक चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे. कारमधील व्यक्तींकडून कागदपत्रांची तपासणी सुरू असून, रोकड मोजण्याचे आणि पुढील चौकशीचे काम निवडणूक विभागाचे अधिकारी करत आहेत. या कारवाईमुळे निवडणुकीच्या तोंडावर हिंगोलीतील राजकीय वातावरणात मोठी चर्चा रंगली आहे.

Tags: ElectionElection commissionHingoliLocal body electionMaharashtrapolicepoliticsVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

मटण, दारू नाही तर विकासाला मत द्या; सुजात आंबेडकर यांचे आवाहन

Next Post

प्रलंबित नगरपालिका निवडणुकीत मतदारांचा संताप; तांत्रिक बिघाडामुळे मतदान केंद्रावर गोंधळ

Next Post
प्रलंबित नगरपालिका निवडणुकीत मतदारांचा संताप; तांत्रिक बिघाडामुळे मतदान केंद्रावर गोंधळ

प्रलंबित नगरपालिका निवडणुकीत मतदारांचा संताप; तांत्रिक बिघाडामुळे मतदान केंद्रावर गोंधळ

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
राजकीय प्रचाराची ‘वंचित’ स्टाईल!नवदाम्पत्याला भेट दिले विजयाचे पोस्टर
बातमी

राजकीय प्रचाराची ‘वंचित’ स्टाईल!नवदाम्पत्याला भेट दिले विजयाचे पोस्टर

by mosami kewat
December 22, 2025
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने आगामी निवडणुकांसाठी दिलेला ‘एक संधी वंचितला’ हा निर्धार आता केवळ राजकीय सभांपुरता मर्यादित न राहता...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीचे निवडणुकीत जोरदार पुनरागमन; कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य, औरंगाबादमध्ये फटाक्यांची आतिषबाजी

वंचित बहुजन आघाडीचे निवडणुकीत जोरदार पुनरागमन; कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य, औरंगाबादमध्ये फटाक्यांची आतिषबाजी

December 22, 2025
उस्मानाबादमध्ये ‘वंचित’ची धमाकेदार एन्ट्री! २५ वर्षीय रिमा शिंदे ठरल्या जिल्ह्यातील सर्वात तरुण नगरसेविका

उस्मानाबादमध्ये ‘वंचित’ची धमाकेदार एन्ट्री! २५ वर्षीय रिमा शिंदे ठरल्या जिल्ह्यातील सर्वात तरुण नगरसेविका

December 21, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाने दिली खात्री: ‘वंचित’ आता निर्णायक शक्ती – प्रा. डॉ किशोर वाघ

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाने दिली खात्री: ‘वंचित’ आता निर्णायक शक्ती – प्रा. डॉ किशोर वाघ

December 21, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘वंचित’ची जोरदार मुसंडी !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘वंचित’ची जोरदार मुसंडी !

December 21, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home