Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर कायम; अनेक जिल्ह्यांना ‘यलो’ तर कोकणात ‘रेड अलर्ट’ जारी

mosami kewat by mosami kewat
August 29, 2025
in बातमी
0
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर कायम; अनेक जिल्ह्यांना ‘यलो’ तर कोकणात ‘रेड अलर्ट’ जारी
       

‎मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील हवामानाबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट दिले आहे. राज्याच्या विविध भागांत, विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भात, मान्सून सक्रिय आहे. येत्या २४ तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.‎‎

कोकणात ‘रेड अलर्ट’‎‎

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या भागांमध्ये ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क चे आदेश देण्यात आले आहे.

‎‎राज्यातील २३ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.‎‎

विदर्भातही पावसाचा जोर वाढणार असून नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

‎‎पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगावमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

‎‎देशभरातील पावसाची स्थिती‎‎राजस्थान आणि तेलंगणा:

डोंगराळ प्रदेशांव्यतिरिक्त राजस्थान आणि तेलंगणामध्येही जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेलंगणामधील कामारेड्डी आणि मेडक जिल्ह्यांमध्ये गेल्या २४ तासांत ५० वर्षांचा विक्रम मोडणारा पाऊस झाला आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील वाहतूक ठप्प झाली आहे.‎

दिल्ली-एनसीआर: दिल्ली आणि एनसीआरमध्ये जोरदार पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी अनेक रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक कोंडी झाली आहे. हवामान विभागाने आजही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे कमाल तापमान ३० अंश सेल्सियस तर किमान तापमान २३.५ अंश सेल्सियसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

‎‎एकूणच, देशभरात मान्सून सक्रिय असून, अनेक ठिकाणी पूर, अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


       
Tags: FarmerkokanMaharashtraMonsoonmumbairainRainfallVidarbhat
Previous Post

औरंगाबादमध्ये ओबीसी समाजातील तरुणाची हत्या : प्रकाश आंबेडकरांची पीडित कुटुंबाला भेट

Next Post

वंचीत बहुजन आघाडी तर्फे मोफत ई-केवायसी शिबिर संपन्न

Next Post
वंचीत बहुजन आघाडी तर्फे मोफत ई-केवायसी शिबिर संपन्न

वंचीत बहुजन आघाडी तर्फे मोफत ई-केवायसी शिबिर संपन्न

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!
बातमी

ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!

by mosami kewat
October 10, 2025
0

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे, या पार्श्वभूमीवर आज...

Read moreDetails
पिंपरी-चिंचवड: धावत्या 'ई-बस'ला आग, दरवाजे लॉक झाल्याने प्रवाशांची पळापळ, मोठी दुर्घटना टळली

पिंपरी-चिंचवड: धावत्या ‘ई-बस’ला आग, दरवाजे लॉक झाल्याने प्रवाशांची पळापळ, मोठी दुर्घटना टळली

October 10, 2025
भारतीय संविधान आणि राष्ट्र पुरूषांची विटंबना करणाऱ्या बार्टी मधील अर्बन नक्षली विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - राजेंद्र पातोडे.

भारतीय संविधान आणि राष्ट्र पुरूषांची विटंबना करणाऱ्या बार्टी मधील अर्बन नक्षली विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – राजेंद्र पातोडे

October 10, 2025
जातीभेदामुळे आयपीएस अधिकारी वाय. पुरन कुमार यांची आत्महत्या; जातीय मानसिकतेचा बळी - ॲड. प्रकाश आंबेडकर

जातीभेदामुळे आयपीएस अधिकारी वाय. पुरन कुमार यांची आत्महत्या; जातीय मानसिकतेचा बळी – ॲड. प्रकाश आंबेडकर

October 10, 2025
फिलिपाइन्सला पुन्हा भूकंपाचा तडाखा; रिश्टर स्केलवर ७.६ तीव्रतेचे धक्के, त्सुनामीचा इशारा जारी

फिलिपाइन्सला पुन्हा भूकंपाचा तडाखा; रिश्टर स्केलवर ७.६ तीव्रतेचे धक्के, त्सुनामीचा इशारा जारी

October 10, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home