अकोला – केंद्र आणि राज्य शासन ओबीसींची दिशाभूल करत आहे, या शासनापासून ओबीसींनी सतर्क राहावे आणि एकसंघ होऊन ओबीसींच्या हक्कासाठी सामूहिक लढा द्यावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
वंचित बहुजन आघाडी अकोला पूर्व शहराच्यावतीने क्रीडा संकुल येथील जिल्हा परिषद सभापती निवासस्थानाच्या प्रांगणात ३० जानेवारी रोजी जिल्हा परिषद सदस्य व महानगर अध्यक्ष शंकरराव इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली या ओबीसी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर, प्रा.अंजलीताई आंबेडकर, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव इंगळे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, धैर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखडे, अँड नरेंद्र बेलसरे, किरणताई बोराखडे, अँड संतोष रहाटे यांची उपस्थिती होती.
केंद्र व राज्य सरकार ओबीसी आरक्षण न देण्यामागील षडयंत्र व आजची राजकीय स्थिती या विषयावर या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले की, जोपर्यंत ओबीसी संघटीत होत नाही आणि सत्ता हातात घेत नाही तोपर्यंत हे चित्र बदलणार नाही. आता राजकीय आरक्षण गेले या नंतर शैक्षणिक आरक्षण गेल्याशिवाय राहणार नाही. केंद्र आणि राज्य शासन ओबीसींची जनगणना करण्याबाबत का उत्सूक नाही, याचा ओबीसींनी शोध घेतला पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी अँड. नरेंद्र बेलसरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
प्रा.अंजलीताई आंबेडकर यांनी ओबीसींची समस्या आणि त्यावर उपाय यावर प्रभावी मार्गदर्शन केले. प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे, किरण ताई बोराखडे, शंकरराव इंगळे, संतोष रहाटे, डॉ. पुंडकर, बालमुकुंड भिरड, माणिक शेळके, शिंदे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांचा सत्कार
महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या अकोला जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अँड.नरेंद्र बेलसरे यांचा तर विधी सल्लागार म्हणून निवड झाल्याबद्दल अँड.संतोष राहटे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य शंकराव इंगळे यांच्या उपस्थिती काही मान्यवरांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. यामध्ये भाजपचे बूथ प्रमुख सुरज जरांगे, देवानंद नेवारे, रोहित सहारे, शुभम नाईकनवरे, भूषण काटे, संभाजी ब्रिगेड चे माजी अध्यक्ष डॉ.प्रकाश गोंड, देवानंद भोसले, उमेश जरांगे, निलेश जरांगे यांचा समावेश आहे, यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. यावेळी हाजी जहेद हुसेन सहाब, शाम देशमुख, प्रवीण वरणकर, दिलीप गिरे, विनोद मिश्रा, अँड. आकाश भगत, विठ्ठल वलिवकार, प्रशांत वैराळे, विश्वास पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.