Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

फ्रान्स राफेल विमानाचे सोर्स कोड शेअर करणार नाही; पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात आपले वैमानिक मारले जावेत अशी मोदींची इच्छा आहे ?

mosami kewat by mosami kewat
February 23, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
फ्रान्स राफेल विमानाचे सोर्स कोड शेअर करणार नाही; पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात आपले वैमानिक मारले जावेत अशी मोदींची इच्छा आहे ?

फ्रान्स राफेल विमानाचे सोर्स कोड शेअर करणार नाही; पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात आपले वैमानिक मारले जावेत अशी मोदींची इच्छा आहे ?

मुंबई : अलीकडील एका फ्रेंच अहवालात भारताला राफेल लढाऊ विमानांच्या मुख्य इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्रणालींचा सोर्स कोड मिळणार नसल्याचे उघड झाले आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप करत राफेल कराराला “भारतविरोधी” संबोधले आहे.

सदर अहवालानुसार Thales निर्मित RBE2 AESA रडार, मॉड्युलर मिशन कॉम्प्युटर, मॉड्युलर डेटा प्रोसेसिंग युनिट (राफेलचे ब्रेन) तसेच SPECTRA इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट यांसारख्या अत्यावश्यक प्रणालींचा सोर्स कोड भारताला देण्यात येणार नाही. (prakash ambedkar)

१९ फेब्रुवारी २०२६ रोजी केलेल्या आपल्या ट्विटमध्ये आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना उद्देशून पाच महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते. “भारताला राफेलचा सोर्स कोड मिळणार आहे का? शंभर टक्के तंत्रज्ञान हस्तांतरणाची हमी आहे का?” असे थेट सवाल त्यांनी विचारले होते.

फ्रेंच अहवालानंतर “आज माझी भीती खरी ठरली आहे. भारताला राफेलचा सोर्स कोड मिळणार नाही,” असे ते म्हणाले. अलीकडील भारत-पाकिस्तान संघर्षाच्या संदर्भात भारतीय हवाई दलाकडे सोर्स कोडचा अभाव हा पाकिस्तानविरुद्ध गंभीर सामरिक तोटा ठरल्याचा आरोप त्यांनी केला. (prakash ambedkar)

“युद्धाच्यावेळी भारतीय अस्त्र किंवा ब्रह्मोससारखी क्षेपणास्त्रे स्वतंत्रपणे एकत्रित करता येत नाहीत अशा लढाऊ विमानावर करदात्यांचे ३६ अब्ज डॉलर्स का खर्च केले जात आहेत?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हा करार पुढील ४० वर्षांसाठी भारताची आघाडीची हवाई हल्ला क्षमता फ्रान्सच्या मनःस्थितीवर अवलंबून ठेवतो, असा दावा त्यांनी केला.

“मोदी पाकिस्तान आणि चीनला युद्धात भारतावर आघाडी घ्यायची इच्छा बाळगतात का? मोदी आपल्या वैमानिकांचा मृत्यू व्हावा अशी इच्छा बाळगतात का?” अशा तीव्र शब्दांत त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली हा करार करण्यात आला आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (prakash ambedkar)

Tags: AatmanirbharBharatDefenseNewsDefenseProcurementGeopoliticsIndiaDefenseIndiaFranceDefenseIndianAirForceIndiaPakistanTensionsMilitaryTechnologyNarendraModiNationalSecurityprakashambedkarRafaleControversyRafaleDealRajnathSinghSourceCodeRowStrategicAffairsTechnologyTransfer
Previous Post

अखेर अनुसूचित जातीच्या वस्तीतील विकासकामांना पालकमंत्र्यांनी दिलेली स्थगिती मागे

Next Post

बीडमधील मृत GST अधिकारी सचिन जाधवर यांच्या पत्नीला प्रकाश आंबेडकरांचा फोन; न्याय मिळेपर्यंत सोबत राहण्याचे दिले आश्वासन !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का - ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
April 5, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशाच्या संरक्षण धोरणाबाबत गंभीर मुद्दे उपस्थित करत केंद्र सरकारवर...

Read moreDetails
नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

April 5, 2026
दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

April 4, 2026
Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

April 4, 2026
सवंग प्रसिद्धीची 'बेडूक उडी'!

सवंग प्रसिद्धीची ‘बेडूक उडी’!

April 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home