बीड : बीडमधील मृत GST अधिकारी सचिन जाधवर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांनी जाधवर यांच्या पत्नीशी फोनवर संवाद साधत कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठिंबा दर्शविला आहे.
‘न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत,’ असे आश्वासन आंबेडकर यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. सचिन जाधवर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिल्याचेही सांगितले जात आहे. संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल झाला असला तरी तपासात अपेक्षित गती नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. (beed news)
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणात सक्रिय भूमिका घेतली असून, जाधवर कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात प्रशासनाविरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...
Read moreDetails






