Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home अर्थ विषयक

जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि आपल्या खिशावर होणारा परिणाम

mosami kewat by mosami kewat
April 1, 2026
in अर्थ विषयक
0
जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि आपल्या खिशावर होणारा परिणाम

जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि आपल्या खिशावर होणारा परिणाम

       

– संजीव चांदोरकर

हे नवीन वित्तवर्ष त्याच्या पाहिल्याच दिवसांपासून एकाचवेळी अनेक प्रकारच्या अनिश्चितता घेऊन येत आहे. एवढ्या की सध्याच्या काळात जर कोणती गोष्ट निश्चित असेल तर ती आहे नजिकच्या काळातील अनिश्चितता.

इराण युद्धामुळे, आणि उद्या युद्ध थांबले तरी, भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम गंभीर असू शकतात. युद्ध अजून पेटले तर बघायलाच नको. त्यामुळे प्रत्येक वस्तू आणि सेवा क्षेत्रात वाढू शकणारी महागाई, अनेक पेट्रोलियम आधारित वस्तूंची टंचाई, घसरता रुपया डॉलर विनिमय दर, विविध देशांशी केले जाणारे व्यापार करार, पर्यावरणीय बदल, शेती क्षेत्रातील अरिष्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे संघटित क्षेत्रातील नोकऱ्यांवर होणारे परिणाम, संघटित क्षेत्रातील नोकऱ्यांमुळे असंघटित क्षेत्रातील धंदे, व्यवसाय, सेवा यावर गंभीर परिणाम होत असतात, आणि सर्वच कुटुंबाचा वाढलेला कर्जबाजारीपणा.. यादी अजून मोठी करता येईल.

यातील अनेक गोष्टींवर आपले नियंत्रण नाही. आपल्या हातात कोणती एक गोष्ट असू शकते तर ती आहे हातात येणाऱ्या पैशाचे, संचित बचतीचे नियोजन.

सर्व प्रथम ज्या काही बचती असतील त्या जपा. व्याजदर जास्त देतो, दामदुप्पट करून देतो म्हणून कोणाच्याही हातात बचती सुपूर्द करू नका. खतरनाक लोक असतात ते. बचतींवर कमी पैसे मिळाले तरी चालतील. शेयर मार्केट कळत नसेल तर भरीला पडू नका. मुद्दलाची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची.

जेव्हढी आवश्यक असतील तेवढीच कर्जे काढा, नवीन कर्जे कमी काढा, कर्ज कोणीतरी दारात येऊन देत आहे, सहज उपलब्ध आहे म्हणून घेऊ नका, कर्ज घ्यायचे की नाही, किती घ्यायचे, त्याचा कशासाठी विनियोग करायचा हा निर्णय फक्त आणि फक्त तुमच्या कुटुंबाचा असला पाहिजे, जमत असेल तर जास्त व्याजाची कर्जे फेडण्याचा प्रयत्न करा. ईएमआयचे ओझे कमी करा..

थोडे महाग झाले तरी सकस आहारावरच्या खर्चात बिलकुल कपात करू नका. तुमचे आजारी न पडणारे, निरोगी शरीर हे तुमच्या हातातील एकमेव हत्यार आहे. त्याच्याच आधारे तुम्ही पैसे मिळवू शकता. आजारी पडले तर आजारपणावरचा खर्च वाढतोच पण उत्पन्न देखील कमी होते. अर्थात यात तुमच्या शाळा कॉलेज जाणाऱ्या मुलामुलींचा आहार देखील आलाच. त्यांची शिक्षणे, कुटुंबातील सभासदांचे आजारपण हे सर्व अत्यावश्यक खर्च सदरात मोडते.

जे भांडवली खर्च , स्मार्टफोन, घरातील सामान…इत्यादी पुढे ढकलता येतील ते काही दिवस पुढे ढकला, जे खर्च स्टेटस साठी अशा सदरात मोडू शकतील ते पुढे ढकला. अनेक समारंभ पुढे ढकलू शकत नाही. मान्य. पण बघा, जमले तर साधेपणाने साजरे करा..

एक एक रुपया जमेल तसा बाजूला काढा. थेंबे थेंबे तळे साचे. बचती शॉक अब्सरॉरबर सारख्या असतात. शॉक न बसणे आपल्या हातात नाही. पण शॉक सहन करण्याची शक्ती जमेल तशी वाढवणे आपल्या हातात आहे.

हे सर्व निर्णय कुटुंबामध्ये एकत्र बसून घ्या, वाढत्या वयाच्या शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुला मुलींना त्यात सामील करून घ्या.

विशेषतः महिलांना आवाहन.

तुमच्या आया, आज्या आणि नात्यातील / वस्तीतील अनेक स्त्रियांकडून पैशाचे नियोजन कसे करायचे याबद्दल तुमच्याकडे उपजत असलेले शहाणपण…अनेक पदव्या, एम बी ए केलेल्या, कॉम्प्युटरचा वापर करणाऱ्या बँकिंग / वित्त क्षेत्रातील प्रोफेशनल पेक्षा खूप मोठे आहे.


       
Tags: Debt ManagementEconomic CrisisEconomic UncertaintyFinancial AwarenessFinancial PlanningFuture PlanningMoney ManagementNew Income Tax RulesNew Income Tax Rules From 1 April 2026
Previous Post

LPG Gas Price Hike : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९५ रुपयांची वाढ; हॉटेलिंग महागणार?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि आपल्या खिशावर होणारा परिणाम
अर्थ विषयक

जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि आपल्या खिशावर होणारा परिणाम

by mosami kewat
April 1, 2026
0

- संजीव चांदोरकर हे नवीन वित्तवर्ष त्याच्या पाहिल्याच दिवसांपासून एकाचवेळी अनेक प्रकारच्या अनिश्चितता घेऊन येत आहे. एवढ्या की सध्याच्या काळात...

Read moreDetails
LPG Gas Price Hike : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९५ रुपयांची वाढ; हॉटेलिंग महागणार?

LPG Gas Price Hike : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९५ रुपयांची वाढ; हॉटेलिंग महागणार?

April 1, 2026
नवीन नियम लागू! ATM, रेल्वे तिकीट आणि बँकिंग अपडेट्स जाणून घ्या

नवीन नियम लागू! ATM, रेल्वे तिकीट आणि बँकिंग अपडेट्स जाणून घ्या

April 1, 2026
Housing Scheme : वंचित बहुजन आघाडीच्या ‘जनता दरबारात’ घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या मार्गी

Housing Scheme : वंचित बहुजन आघाडीच्या ‘जनता दरबारात’ घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या मार्गी

March 31, 2026
Pune Crime : धानोरीतील आक्षेपार्ह स्टेटसप्रकरणी परप्रांतीय तरुणास अटक

Pune Crime : धानोरीतील आक्षेपार्ह स्टेटसप्रकरणी परप्रांतीय तरुणास अटक

March 31, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home