झारखंड : झारखंडमधील देवघर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. मंगळवारी पहाटे गोड्डा-देवघर मार्गावर, मोहनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कावडियांना घेऊन जाणाऱ्या एका बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या या बसने समोरून येणाऱ्या गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. पहाटे साडेपाचच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत १९ कावडियांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर मदतकार्य सुरू झाले, मात्र अपघात जंगलमय भागात झाल्याने बचावकार्यात अनेक अडथळे येत होते.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात अनेक कावडी गंभीर जखमी झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्हा प्रशासनाने तातडीने जवळच्या सरकारी आणि खाजगी रुग्णालयांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून जखमींना त्वरित वैद्यकीय मदत मिळू शकेल. सध्या श्रावणी मेळ्यामुळे झारखंडमधील प्रसिद्ध बाबा बैद्यनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमधून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असताना हा अपघात झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
87.5 कोटींचं कर्ज 150 कोटींवर कसं पोहोचलं? धक्कादायक आर्थिक गैरव्यवहार उघड!
एका धक्कादायक फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टमधून पृथ्वी रिअल्टर्स अॅण्ड हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एका बँकेदरम्यान मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे....
Read moreDetails