नागपूर: आदिवासी गोवारी जमातीचे “आमरण उपोषण” दिनांक २६ जानेवारी पासून संविधान चौक नागपूर येथे सुरू आहे. उपोषणाला आज दहा दिवस पूर्ण होत असताना सुध्दा शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही तथा पूर्व विदर्भातील ३६ आमदार आणि ६ खासदार सुद्धा दखल घ्यायला तयार नाहीत.
त्यामुळे या सर्व आमदार व खासदारांच्या विरोधात संविधान चौक नागपूर येथे चक्का जाम आणि नारे-निदर्शने आंदोलन सोमवारी दुपारी १२ वाजता वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष मा. रवीभाऊ शेंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.यावेळी मोठया संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शहर अध्यक्ष रवी शेंडे, गोवारी समाजाचे नेते व वंचित बहुजन आघाडी विदर्भ संयोजन समिती सदस्य भगवान भोंडे, माना समाजाचे नेते अरविंद सांदेकर, शहर महसचिव राहुल दहिकर, धर्मेश प्रसेंजित, नागपूर जिल्हा युवा अध्यक्ष मनीष बोरकर, भंडारा जिल्हा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे, प्रा. रपेंद्र खांडेकर, सिद्धांत पाटील, धम्मदीप लोखंडे, उत्तर नागपूर अध्यक्ष प्रवीण पाटील, सुमित चौहान,अनिकेत मेश्राम,अथांग करोडे, देवेंद्र मेश्राम सदानंद शेंडे, मनोज मेश्राम,महिला आघाडीच्या सुदेशना मेश्राम, नलिनी खांडेकर, माया शेंडे,प्रतिमा तिरपुडे, रिता जामगाडे, शालू शहारे ई. मोठया संख्येने या आंदोलनात उपस्थित होते.