Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुणे-सातारा महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; हाय-व्होल्टेज सबस्टेशन व टॉवर लाईन प्रकल्प रद्द करण्याची मागणी

mosami kewat by mosami kewat
August 24, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पुणे-सातारा महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; हाय-व्होल्टेज सबस्टेशन व टॉवर लाईन प्रकल्प रद्द करण्याची मागणी
       
भोर : भोर तालुक्यातील भोंगवली गावात प्रस्तावित असलेल्या पुणे ट्रान्समिशन ३ या खासगी कंपनीच्या हाय-व्होल्टेज सबस्टेशन आणि टॉवर लाईन प्रकल्पाला विरोध करत शेतकऱ्यांनी रविवारी ( दि.२३) पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ परिसरात रास्तारोको आंदोलन सुरू केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी सहभागी शेतकऱ्यांनी रस्त्यात बसून आंदोलन केले. 

‘हाय-व्होल्टेज सबस्टेशन हटवा’, ‘भोर-राजगड वाचवा’, ‘अदानी हटाओ’, ‘सबस्टेशन होऊ देऊ नका’, अशा आशयाचे फलक हातात घेत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. प्रस्तावित हायटेंशन टॉवर लाईनमुळे सुपीक शेतजमिनी बाधित होणार असून शेतकऱ्यांच्या शेतीवर त्याचा  परिणाम होईल, असा आक्षेप आंदोलकांनी घेतला आहे.

भोंगवली गावात उभारण्यात येणारा हाय-व्होल्टेज सबस्टेशन आणि टॉवर लाईनचा प्रकल्प तातडीने रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. प्रकल्पामुळे शेतजमिनी, शेतीचे उत्पादन आणि स्थानिक पर्यावरणावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट रोजी आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. भोर येथील महिला सरपंचांनीही त्यांची भेट घेऊन या प्रश्नावर चर्चा केली. यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील, असे आश्वासन देण्यात आले.

भोंगवली गावातील शेतकरी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते विठ्ठल गायकवाड हे आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. या आंदोलनासाठी भोर तालुक्यात ‘शेतकरी संघर्ष समिती’ स्थापन करण्यात आली असून समितीच्या माध्यमातून आंदोलनाला दिशा देण्यात येत आहे.

Tags: AgricultureBhor Farmer ProtestFarmerPoliticalPrakash AmbedkarpunePune Satara highway
Previous Post

देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!

Next Post

पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

Next Post
पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक - प्रा. अंजलीताई आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home