सोलापूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यूबाबत विधानसभेत खोटी माहिती दिली होती. औरंगाबाद खंडपीठाने याबाबत आरोपी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यावरूनच वंचित बहुजन आघाडी सोलापूरचे पदाधिकारी विक्रांत गायकवाड यांनी मागणी केली आहे की, सूर्यवंशी कुटुंबीय आणि आंबेडकरी चळवळीची जाहीर माफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागावी. गायकवाड पुढे म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला नाही, ही माहिती पूर्णपणे खोटी आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधानसभेत खोटे बोलत असेल, तर त्यामागे काय कारण आहे? असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. गायकवाड यांनी फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना विचारले आहे की, सोमनाथ सूर्यवंशी हे वडार समाजाचे होते किंवा आंबेडकर चळवळीत कार्यरत होते, यामुळे त्यांच्याबद्दल राग होता का?
तसेच, जर सूर्यवंशी यांच्या जागी “तन्मय चिन्मय” नावाचे कुणी असते, तर फडणवीस यांची भूमिका वेगळी असती का? असा थेट सवालही त्यांनी केला आहे. न्याय देताना जात किंवा धर्म पाहू नये, असे आवाहन गायकवाड यांनी फडणवीस यांना केले आहे.
महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना सर्वोच्च मुख्यमंत्री पदावर बसवले असताना, जर ते विधानसभेत खोटे बोलत असतील किंवा चुकीचे वागत असतील, तर त्यांना त्या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे गायकवाड यांनी म्हटले आहे. विक्रांत गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशी, त्यांचे कुटुंबीय आणि आंबेडकरी चळवळीची जाहीरपणे माफी मागावी आणि आपले चुकीचे वक्तव्य तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी केली आहे.
Pune : वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने जनता दरबार
पुणे : वंचित बहुजन आघाडी, पुणे शहर कार्यकारिणीच्या वतीने आयोजित जनता दरबार नुकताच पार पडला. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अनिल...
Read moreDetails