अमरावती : दर्यापूर येथील विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संवाद बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीचे आयोजन तालुका अध्यक्ष चंदू भाऊ रायबोले यांनी केले होते, तर अध्यक्षस्थान जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार यांनी भूषविले.
बैठकीस महासचिव साहेबरावभाऊ वाकपांजर, महासचिव अशोक भाऊ नवलकर, जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव इंगळे, जिल्हा सचिव अशोकराव दुदंडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण राजुरकर, जिल्हा सहसचिव सलीम जमादार यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच बाबूलाल धाकडे, रीना तायडे, नंदा हंबर्डे, उमा हंबर्डे, पद्मा हंबर्डे यांनी उपस्थित राहून महिलांच्या राजकीय सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
बैठकीदरम्यान विविध भागांतील इच्छुक उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. या बैठकीस मनोज भदे, वासुदेव खडे, देवराव चौरपगार, रवींद्र खडे, सुधाकर तायडे, गजानन सोळंके, विशाल खडे, विनोद चव्हाण, संतोष खडे, गणेश सुरजुसे, वीरेंद्र खडे, राहुल इंगळे, जय चव्हाण, वैभव सुरजुसे, करण खंडारे, विकी गवई, भूषण खडे, डॉ. भीमराव खडे, वाल्मीक इंगोले, गंगाधर अटंबर, नागेश खडे, गजानन शेगोकार, कैलास चव्हाण, राहुल वानखडे, संजू निरंजन चौरपगार यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीत पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. इच्छुक उमेदवारांना पक्ष धोरण, प्रचार रणनीती आणि जनसंपर्क याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष चंदू रायबोले यांनी केले. शेवटी जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानून बैठक यशस्वीरीत्या संपन्न झाल्याची घोषणा केली.






