Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

इलेक्टोरल बाँड्स योजना आजपर्यंतचा मोठा घोटाळा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 15, 2024
in Uncategorized
0
इलेक्टोरल बाँड्स योजना आजपर्यंतचा मोठा घोटाळा
       

ॲड. प्रकाश आंबेडकर : भाजप – आरएसएसने कंपन्यांना काय ऑफर दिली ते पाहणे महत्वाचे

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज बहुचर्चित निवडणूक रोख्यांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सर्वांत जास्त लाभ भाजपला झाल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर तृणमूल काॅंग्रेस, काॅंग्रेस यांचा नंबर दिसून येत आहे. या सर्व घडामोडीवर माध्यमांवर प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया एक्स हॅंडलवर नोंदवली असून, त्यांनी केंद्र सरकारची 2018 ची इलेक्टोरल बाँड्स योजना देशातील आजपर्यंतचा सर्वांत मोठा घोटाळा ठरला आहे; भाजपने इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून एकूण 6 हजार 60 कोटी रुपये कमावल्याची टीका केली आहे. तसेच, आता भाजप-आरएसएस सरकारने कंपन्यांना इलेक्टोरल बाँड्ससाठी काय ऑफर दिली हे पाहणे मनोरंजक ठरणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी भाजपा आणि मोदी सरकारची पोलखोल करताना, निव्वळ नफ्यामध्ये 215 कोटी असलेल्या कंपनीने 1 हजार 368 कोटींचे इलेक्टोरल बाँड्स खरेदी करणे कसे शक्य आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, निव्वळ नफ्यामध्ये फक्त 10 कोटी असलेल्या आणखी एका कंपनीने 185 कोटींचे इलेक्टोरल बाँड खरेदी केल्याचे त्यांनी म्हटले आहे.  घोंचू मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप आणि त्यांच्या भ्रष्ट गुंडांना तुरुंगात टाकले पाहिजे असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.


       
Tags: bjpelectrol bondPrakash AmbedkarrssVanchit Bahujan Aghadi
Previous Post

परळीत ‘वंचित’ च्या युवा आघाडीतर्फे ‘प्रबुद्ध भारत’ सभासद नोंदणी अभियान सुरू.

Next Post

वंचित बहुजन आघाडीने मविआचा 2 जागांचा प्रस्ताव फेटाळला

Next Post
वंचित बहुजन आघाडीने मविआचा  2 जागांचा प्रस्ताव फेटाळला

वंचित बहुजन आघाडीने मविआचा 2 जागांचा प्रस्ताव फेटाळला

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
केवळ पाठिंबा नको, आंदोलनात सहभागी व्हा; प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना पत्र 
बातमी

केवळ पाठिंबा नको, आंदोलनात सहभागी व्हा; प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना पत्र 

by mosami kewat
February 27, 2026
0

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एपस्टीन फाईलमध्ये आलेले नाव, अमेरिकेसोबत केलेला व्यापार करार ज्यामुळे देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे....

Read moreDetails
आर्टिफिशियल इंटेलिजन्स: विस्थापनाचा वेग आणि सामान्यांचा संघर्ष

आर्टिफिशियल इंटेलिजन्स: विस्थापनाचा वेग आणि सामान्यांचा संघर्ष

February 27, 2026
दिल्ली मद्य धोरण प्रकरण: अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा; राऊज एव्हेन्यू कोर्टाकडून 'क्लीन चीट'

दिल्ली मद्य धोरण प्रकरण: अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा; राऊज एव्हेन्यू कोर्टाकडून ‘क्लीन चीट’

February 27, 2026
अल्पवयीन गोसावी समाजातील मुलगी बेपत्ता; तात्काळ शोधासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रशासनाला निवेदन

अल्पवयीन गोसावी समाजातील मुलगी बेपत्ता; तात्काळ शोधासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रशासनाला निवेदन

February 27, 2026
जालना: वंचितच्या पाठपुराव्याला यश; घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते आठवड्यात जमा होणार

जालना: वंचितच्या पाठपुराव्याला यश; घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते आठवड्यात जमा होणार

February 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home