Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ : SBI च्या २,९२९ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी ED कडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल

mosami kewat by mosami kewat
September 10, 2025
in बातमी
0
अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ : SBI च्या २,९२९ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी ED कडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल

अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ : SBI च्या २,९२९ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी ED कडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल

       

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. भारतीय स्टेट बँक (SBI) चे तब्बल २,९२९ कोटी रुपयांचे नुकसान केल्याच्या आरोपावरून आता सक्तवसुली संचालनालयाने (ED) त्यांच्या आणि त्यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीच सेबीने त्यांची येस बँकेतील गुंतवणुकीची चौकशी बंद करण्याची मागणी फेटाळून लावली होती.
‎
‎हे नवीन प्रकरण केंद्रीय तपास संस्था (CBI) ने २१ ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या एफआयआरवर आधारित आहे. या एफआयआरनंतर २३ ऑगस्ट रोजी सीबीआयने त्यांच्या मुंबईतील कार्यालय आणि निवासस्थानी छापेही टाकले होते.
‎
‎आरोपांचे अनिल अंबानींकडून खंडन
‎
‎या प्रकरणावर अनिल अंबानी यांच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी करून सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एसबीआयने सुमारे १० वर्षांपूर्वीच्या प्रकरणांवर ही तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर, ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी अनिल अंबानी हे रिलायन्स कम्युनिकेशनचे (RCom) गैर-कार्यकारी संचालक होते आणि कंपनीच्या दैनंदिन व्यवस्थापनात त्यांचा थेट सहभाग नव्हता, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. सीबीआयच्या कारवाईनंतर आता ईडीनेही या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगच्या संशयावरून तपास सुरू केला आहे.
‎
‎बँक कर्जांची सखोल चौकशी
‎
‎ईडीने आतापर्यंत अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपन्यांच्या कथित बँक फसवणुकीतील भूमिकेची तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चौकशी केली आहे. १८ ऑगस्टच्या एका मीडिया रिपोर्टनुसार, ईडीने १७,००० कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान, ईडीने २० हून अधिक खाजगी आणि सार्वजनिक बँकांना पत्र लिहून रिलायन्स ग्रुपला दिलेल्या कर्जाची आणि त्यांच्या क्रेडिट तपासणीची माहिती मागवली आहे.
‎
‎अनिल अंबानींच्या निकटवर्तीयाची चौकशी
‎
‎याच प्रकरणाच्या चौकशीदरम्यान, ईडीने मंगळवारी अनिल अंबानींचे माजी निकटवर्तीय अमिताभ झुनझुनवाला यांचीही चौकशी केली. याआधीही ते तपासणीदरम्यान ईडीसमोर हजर झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसबीआयच्या मुंबई शाखेच्या डीजीएम ज्योती कुमार यांनी १८ ऑगस्ट रोजी ईडीकडे तक्रार दाखल केल्यानंतर या बँक फसवणुकीचा खुलासा झाला. ऑक्टोबर २०२० मध्ये एका फॉरेन्सिक ऑडिटरच्या अहवालातून हे प्रकरण समोर आले होते, असे ज्योती कुमार यांनी सांगितले.


       
Tags: Anil AmbaniEDEnforcement DirectorategovernmentmumbaiReliance IndustriesSBIvbaforindia
Previous Post

परभणी जिल्ह्यात मुस्लिम बांधवांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश!

Next Post

Beed : परळीत शेख शाकेर अहमद यांच्यासह असंख्य तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

Next Post
Beed : परळीत शेख शाकेर अहमद यांच्यासह असंख्य तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

Beed : परळीत शेख शाकेर अहमद यांच्यासह असंख्य तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भाजप–ईव्हीएम–निवडणूक आयोग महागठबंधनाचा विजय; काँग्रेसच्या घोडचुकीने संधी दवडली – सुजात आंबेडकर
बातमी

भाजप–ईव्हीएम–निवडणूक आयोग महागठबंधनाचा विजय; काँग्रेसच्या घोडचुकीने संधी दवडली – सुजात आंबेडकर

by mosami kewat
November 14, 2025
0

हिंगोली : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निकालावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी...

Read moreDetails
बिहारमध्ये NDA ! 200 हून अधिक जागांवर विजय

बिहारमध्ये NDA ! 200 हून अधिक जागांवर विजय

November 14, 2025
नाशिकमध्ये बिबट्याचा थरार: सातपूरमध्ये 9 ते 10 जणांवर हल्ला; वंचित युवा पदाधिकाऱ्यांची धाव

नाशिकमध्ये बिबट्याचा थरार: सातपूरमध्ये 9 ते 10 जणांवर हल्ला; वंचित युवा पदाधिकाऱ्यांची धाव

November 14, 2025
राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या प्रगती जगतापचा बौद्ध महासभेतर्फे जाहीर सत्कार

राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या प्रगती जगतापचा बौद्ध महासभेतर्फे जाहीर सत्कार

November 14, 2025
सुजात आंबेडकर यांचे अमित शहा यांना चॅलेंज!

सुजात आंबेडकर यांचे अमित शहा यांना चॅलेंज!

November 14, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home