Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कर्नाटक काँग्रेस आमदारावर ईडीची कारवाई: बेकायदेशीर सट्टेबाजी, मनी लाँड्रिंग प्रकरणात कोट्यवधींचे घबाड उघड

mosami kewat by mosami kewat
August 23, 2025
in बातमी
0
कर्नाटक काँग्रेस आमदारावर ईडीची कारवाई: बेकायदेशीर सट्टेबाजी, मनी लाँड्रिंग प्रकरणात कोट्यवधींचे घबाड उघड
       

‎बंगळूरु : अंमलबजावणी संचालनालय (ED) ने कर्नाटकातील काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. ईडीने केलेल्या देशव्यापी कारवाईत त्यांच्या ठिकाणांवरून कोट्यवधी रुपयांची रोकड, परदेशी चलन आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत, ज्यामुळे हा गुन्हा अधिक गंभीर असल्याचे समोर येत आहे.

‎‎ईडीच्या बंगळूरु प्रादेशिक कार्यालयाने २२ आणि २३ ऑगस्ट रोजी विविध राज्यांमध्ये, ज्यात बंगळूरु, गंगटोक, चित्रदुर्ग, हुबळी, जोधपूर, मुंबई आणि गोवा यांचा समावेश आहे, एकूण ३१ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत ५ कॅसिनोचाही समावेश होता.

‎‎नेमके प्रकरण काय?‎‎

हे प्रकरण आमदार के. सी. वीरेंद्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध बेकायदेशीर ऑनलाइन आणि ऑफलाइन सट्टेबाजी (बेंटिग) संदर्भात दाखल केलेल्या गुन्ह्याशी संबंधित आहे. तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, आरोपी ‘किंग ५६७’, ‘राजा ५६७’, ‘पपीज ००३’ आणि ‘रत्ना गेमिंग’ यांसारख्या नावांनी अनेक ऑनलाइन सट्टेबाजी साइट्स चालवत होता.‎‎

याशिवाय, वीरेंद्र यांचा भाऊ के. सी. थिप्पेस्वामी दुबईतून ‘डायमंड सॉफ्टेक’, ‘टीआरएस टेक्नॉलॉजीज’, आणि ‘प्राइम९ टेक्नॉलॉजीज’ यांसारख्या व्यावसायिक संस्था चालवतो. या कंपन्या के. सी. वीरेंद्रच्या कॉल सेंटर सेवा आणि गेमिंग ऑपरेशन्सशी संबंधित असल्याचे आढळले आहे.‎‎

छाप्यात सापडलेले घबाड‎‎ईडीच्या या धडक कारवाईत जप्त करण्यात आलेली संपत्ती पाहून तपास यंत्रणाही थक्क झाली आहे.

जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

  • ‎‎१२ कोटी रुपये रोख‎‎
  • जवळपास १ कोटी रुपयांचे परदेशी चलन
  • ‎‎ जवळपास ६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने
  • सुमारे १० किलो वजनाचे चांदीचे दागिने
  • ‎मर्सिडीजसह चार वाहने‎‎
  • १७ बँक खाती आणि २ बँक लॉकर गोठवले‎‎

आमदार के. सी. वीरेंद्र यांचा भाऊ के. सी. नागराज आणि मुलगा पृथ्वी एन. राज यांच्या ठिकाणांवरून मालमत्तेची काही कागदपत्रे आणि आक्षेपार्ह दस्तऐवजही जप्त करण्यात आले आहेत. या मोठ्या कारवाईमुळे मनी लाँड्रिंग आणि बेकायदेशीर सट्टेबाजीच्या प्रकरणांचे जाळे किती मोठे आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास ईडी करत आहे.


       
Tags: bankCongesscrimeEDkarnatakmlamoney laundering caseOnline gamespolice
Previous Post

अनिल अंबानींच्या मुंबईतील निवासस्थानी CBI चा छापा: १७,००० कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणी कारवाई

Next Post

कोथरूड पोलीस प्रकरण : पोलिसांच्या अन्यायाविरोधात लढणाऱ्या मुलींसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत – अंजलीताई आंबेडकर

Next Post
कोथरूड पोलीस प्रकरण : पोलिसांच्या अन्यायाविरोधात लढणाऱ्या मुलींसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत – अंजलीताई आंबेडकर

कोथरूड पोलीस प्रकरण : पोलिसांच्या अन्यायाविरोधात लढणाऱ्या मुलींसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत - अंजलीताई आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!
बातमी

ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!

by mosami kewat
October 10, 2025
0

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे, या पार्श्वभूमीवर आज...

Read moreDetails
पिंपरी-चिंचवड: धावत्या 'ई-बस'ला आग, दरवाजे लॉक झाल्याने प्रवाशांची पळापळ, मोठी दुर्घटना टळली

पिंपरी-चिंचवड: धावत्या ‘ई-बस’ला आग, दरवाजे लॉक झाल्याने प्रवाशांची पळापळ, मोठी दुर्घटना टळली

October 10, 2025
भारतीय संविधान आणि राष्ट्र पुरूषांची विटंबना करणाऱ्या बार्टी मधील अर्बन नक्षली विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - राजेंद्र पातोडे.

भारतीय संविधान आणि राष्ट्र पुरूषांची विटंबना करणाऱ्या बार्टी मधील अर्बन नक्षली विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – राजेंद्र पातोडे

October 10, 2025
जातीभेदामुळे आयपीएस अधिकारी वाय. पुरन कुमार यांची आत्महत्या; जातीय मानसिकतेचा बळी - ॲड. प्रकाश आंबेडकर

जातीभेदामुळे आयपीएस अधिकारी वाय. पुरन कुमार यांची आत्महत्या; जातीय मानसिकतेचा बळी – ॲड. प्रकाश आंबेडकर

October 10, 2025
फिलिपाइन्सला पुन्हा भूकंपाचा तडाखा; रिश्टर स्केलवर ७.६ तीव्रतेचे धक्के, त्सुनामीचा इशारा जारी

फिलिपाइन्सला पुन्हा भूकंपाचा तडाखा; रिश्टर स्केलवर ७.६ तीव्रतेचे धक्के, त्सुनामीचा इशारा जारी

October 10, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home