तिवसा येथे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन व संवाद बैठक संपन्न
अमरावती : सत्तेतील सर्वच पक्षांनी जनतेचा विश्वासघात केला असून विरोधी पक्ष सुद्धा सत्ताधाऱ्यांना शरण गेला आहे. अशा स्थितीत वंचितच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत सर्व ताकदीनिशी आगामी निवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी सज्ज व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केले. ते तिवसा येथे आयोजित जनसंपर्क कार्यालय उदघाटन व संवाद बैठक प्रसंगी बोलत होते.
बोलताना डॉ. पुंडकर म्हणाले की, आंबेडकरी समूहातील कार्यकर्ता हा लढाऊ बाण्याचा असून त्याला भीमकोरगावच्या इतिहासाचा वारसा आहे. त्यामुळे प्रस्थापितांचे राजकारण उलथवून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडून आणण्यासाठी नियोजनबनद्ध कृती कार्यक्रम तयार करावा असे मत डॉ. पुंडकर यांनी मांडले. काल तिवसा येथे वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन व कार्यकर्ता संवाद बैठक पार पडली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष तथा अमरावती जिल्हा निरीक्षक प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. निलेश विश्वकर्मा, प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय बौद्ध महासभाचे राज्य संघटक विजयकुमार चौरपगार, जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम, संजय चौरपगार, युवा आघाडी जिल्हा महासचिव सागर भवते, सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष अजय तायडे, युवा तालुका अध्यक्ष सचिन जोगे, प्रकाश इंगळे, नंदकुमार खंडारे, राहुल भालेराव, सतीश सोनूले, प्रशांत नाईक उपस्थित होते.
मुंबईत संविधान सन्मान महासभा २५ नोव्हेंबर रोजी होणार; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह देशभरातील मान्यवर उपस्थित राहणार!
यावेळी डॉ. पुंडकर यांचे हस्ते फित कापून जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन पार पाडले तर शहरातील पेट्रोलपंप चौकात ढोलताशांच्या गजरात नेत्यांचे स्वागत करण्यात आले. स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे निवडणूक आढावा बैठक पार पडली असून यावेळी सर्कल निहाय आढावा निरीक्षकानी घेतला व उमेदवार निश्चित करण्याबाबत सूचना दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर भवते, संचालन मनीष खरे, तथा आभार सचिन जोगे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जिल्हा सदस्य प्रमोद मुंद्रे, विनोद खाकसे, राजकुमार आसोडे, गजानन आसोडे, डॉ. धर्मेंद्र दवाळे, मुकुंद पखाले, प्रवीण निकाळजे, अनिल सोनोने, निखिल लढे, सिद्धार्थ कटारने, मुस्ताक शहा, प्रमोद गजरे, भारत दाहाट, नितीन थोरात, रोहित गवई, अनिल गाडगे, सतीश चवरे, सागर गोपाळे, अवधूत सोनोने, अजय भवते, परिमल जवंजाळ, किशोर तायडे, आदीभ मुंद्रे सह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कार्यालय उदघाटनाच्या दिवशीच सहा इच्छुकांचे अर्ज
वंचित बहुजन आघाडी तिवसा तालुकाचे वतीने जि. प. व. पं. स. निवडणूक करिता इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन केले असता कार्यालय उदघाटनाचे दिवशीच पाच इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पक्ष निरीक्षकांकडे सदर केले आहे. त्यामध्ये कुऱ्हा जि.प. सर्कल करिता रुपाली प्रमोद मुंद्रे, वऱ्हा जि. प. सर्कल करितामाजी समाजकल्याण सभापती चंद्रपाल तुरकाने यांचे पुतणे स्वप्नील तुरकाने, वरखेड प. स. सर्कल मधुन सोनाली विक्रांत जोगे, तळेगाव ठाकूर प.सं सर्कल करिता मनीष खरे, अनिल सोनोने तर मोझरी प स सर्कल करिता इंजि. अमोल जवंजाळ यांनी आपले अर्ज दाखल केले आहे.






