अकोला- अकोला तालुक्यातील टाकळी पोटे येथे आदिवासी समाजाच्या तरूण सरपंच सौ. जयाताई गजानन चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त धम्माचा प्रचार करणाऱ्या १३१ महिलांचा साडी चोळी देवून सन्मान सोहळा आयोजित केला होता या सोहळ्यातच वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या आद. प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती व आद. अंजलीताई आंबेडकर यांच्याच शुभहस्ते महिलांना साडी चोळी देवून सन्मानित करण्यात आले. या सन्मान सोहळ्यात महिलांना मार्गदर्शन करतांना आद. अंजलीताई आंबेडकर यांनी आपल्या मनोगतात बोलतांना अश्या म्हणाल्या की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर सर्व समाजाला आपले मानले व सर्व समाजातील शोषीत पिडीत लोकांना न्याय देण्यासाठी संघर्ष केला. पण आज पर्यंत बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचेच नेतृत्व समजल्या गेले हि फार मोठी शोकांतिका होती. परंतु आज आदिवासी समाजाच्या महिला सरपंचाने विशेषतः धम्म प्रसारक महिलांचा साळी चोळी देवून सन्मान करणे व या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने बाबासाहेबांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिवादन करणे म्हणजेच खऱ्या रितीने बाबासाहेब आंबेडकर आज बौध्द समाज सोडून इतरही समाजाकडून स्विकारले गेले याचा आनंद होत आहे” असे मत व्यक्त केले.
ह्यानंतर टाकळी पोटे येथे दि. १३ एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त धम्माचा प्रसार करणाऱ्या उपासक मंडळाच्या महिलांना साडी चोळी वाटप करुन सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मा. जि. प. अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मा. सौ. पुष्पाताई इंगळे ह्या होत्या तर वंचितच्या महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती प्रभाताई शिरसाट, जि. प. अध्यक्ष अकोला मा. सौ. प्रतिभाताई भोजने जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा. सौ. सावित्रीबाई राठोड, जि. प. सदस्य सौ. निताताई गवई अकोला पं. स. सभापती मा. राजेशभाऊ वावकार देवळी ग्रामपंचायतच्या सरपंच मा. सौ. वैशालीताई विकास सदांशिव, ग्रामपंचायत जवळा-दोळकी टाकळी पोटे सदस्य त्रिगुणा साहेबराव किर्तक, जवळा दोडकी ग्रामपंचायत सदस्य सौ. रंजनाताई गावंडे आदी मान्यवर मंचकावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वंचितचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव यांनी केले तर आभार गट ग्रामपंचायत जवळा-दोळकी टाकळी पोटे येथील सरपंच सौ. जयाताई गजानन चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष किर्तक, सर्कल अध्यक्ष मोबीन शेख, रितेश किर्तक, दिनेश तायडे, राष्ट्रपाल किर्तक, उजेश ढवळे (आर्मी), विशाल किर्तक, दादु वानखडे, अमोल किर्तक, कुणाल किर्तक, सुमेध शिराळे, प्रतिक किर्तक, कल्पेश किर्तक, अक्षय किर्तक, गुड्डू शिराळे, अनंता सराठे, प्रविण तायडे, सागर तायडे, रामकृष्ण गवई, शिवलाल किर्तक, बाबाराव किर्तक, दत्ता पोटे, गाजानन पोटे, पोलीस पाटील, रतन चव्हाण, साहेबराव पोटे, राहुल किर्तक, गजानन किर्तक, केशव शिराळे, सदाशिव किर्तक, जानराव गवई, समाधान किर्तक, दिवाकर सदाशिव, गोपाल गवई, प्रभाकर तायडे, भावराव किर्तक, मोहण डाबेराव, गणेश पवार, सुखदेव चव्हाण, अरूण चव्हाण, गोकुळ पवार, महादेव चव्हाण, धम्मपाल गवई, मंगल सोळंके, विनायक किर्तक, माणिक किर्तक, देवराव किर्तक यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला गावकऱ्यांची व परिसरातील नागरिकांची आणि बौध्द व आदिवासी महिलांची प्रचंड उपस्थिती होती.