मुंबई: महाराष्ट्रात फुले – शाहु – आंबेडकरांच्या विचारांना काही महत्व आहे का ? असा संतप्त सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. जय श्रीराम बोल म्हणत कणकवली येथील मुस्लिम व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली या पार्श्वभुमीवर त्यांनी संताप व्यक्त केला.एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या निवडणूक फायद्यासाठी जातीय द्वेषाचा विषाणू आयात केला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दंगली भडकावणे, ध्रुवीकरण करणे याशिवाय धार्मिक आणि जातीय दुफळी वाढवून निवडणुकीत फायदा मिळवणे यावरच भाजपचा विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले.
मी जवळपास वर्षभरापासून हेच सांगतोय की भाजप-आरएसएसच्या गुंडांना दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिमांनी सतत भीतीखाली जगावे असं वाटत आलं आहे. कारण, असं झाल्यास भाजप-आरएसएस कायम सत्तेत राहतील असे त्यांनी नमूद केले.