ॲड. प्रकाश आंबेडकर : पुणे लोकसभा मतदारसंघात प्रचार सभा
पुणे : सोनिया गांधी, राहुल गांधी आणि खरगे यांच्यावर चौकशी लागलेली आहे. त्यांना तुम्ही मोदींवर टीका करताना पाहिले आहे का? मी जे मांडतो ते सभागृहातील मांडत आहे, मग काँग्रेसवाल्यांनो तुम्ही हे का मांडत नाही? असा सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
काँग्रेसकडे मोठी संधी आली होती की, जगात जे औषध बंद केले होते. ते भारतात विकण्यात आले. २०१२ साली सोनिया गांधी यांनी जी उपमा वापरली होती मौत का सौदागर. त्यांनी आता विचारलं असते की, एका बाजूला जग रेमडीसिव्हीरवर बंदी आहे आणि भाजपच्या खात्यात १८ कोटी कुठून आले यावरून तुम्ही मौत का सौदागर आहेत का याचा खुलासा करा. पण काँग्रेस या विषयाला उठवायला तयार नसल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, ज्यांचा भ्रमनिरास झाला आहे त्याला अनेक कारणे आहेत. २०१२ साली सोनिया गांधी यांनी गुजरात येथे नरेंद्र मोदींना मौत का सौदागर अशी उपमा दिली होती. त्यावेळी खूप टीका झाली पण काँग्रेसला वाचवता आले नाही.
मेट्रो प्रकल्प म्हणजे वाया गेलेली गुंतवणूक आहे. २६ रुपयांपासून ९६ रुपयांपर्यंत कर्ज वाढवणारी ही मेट्रो आहे हे लक्षात घ्या. अहमदाबाद ते मुंबई एक लाख कोटी जे जपान सरकारकडून घेण्यात आले त्यामुळे कर्ज वाढलेले असल्याचे त्यांनी सांगितले.