मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. शरद पवार गटाकडून एकनाथ खडसे, अमोल कोल्हेंना संधी मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे आणि अमोल किर्तिकरांना संधी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे, तर काँग्रेसकडून नाना पटोले आणि रवींद्र धंगेकर याना संधी मिळाल्याचे बोललं जात आहे. मात्र, शिवसेना(UBT) आणि काँग्रेस यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत संघर्ष असल्याची माहिती समोर येत आहे.
काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात जागांवरून संघर्ष आहे त्यांचं मिटलं, तरच इतर राजकिय पक्षांना त्यात स्पेस मिळेल. काँग्रेस आणि शिवसेनेने 10 लोकसभा मतदारसंघात दावा केला आहे. त्यामुळे एकाच जागेवर दोन पक्षांनी दावा केल्यामुळे मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेनेने आपले संभाव्य उमेदवार अप्रत्यक्ष घोषित केले आहेत.
या 10 जागांपैकी 7 जागांवर शिवसेना, तर भाजप, एमआयएम, अपक्ष असे प्रत्येकी 1 आहेत, तर काँग्रेसकडे एकही खासदार नाहीयेत.
अशीही माहिती मिळत आहे की, 4 किंवा 5 तारखेला दिल्लीत याचा अंतिम फैसला होणार आहे.
‘ते’ 10 लोकसभा मतदारसंघ –
१. औरंगाबाद, २. जालना ३.हिंगोली, ४.कोल्हापूर, ५. मुंबई दक्षिण मध्य, ६. उत्तर पूर्व मुंबई, ७. यवतमाळ वाशीम ८.अमरावती, ९. रामटेक, १०. शिर्डी