मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे ॲड प्रकाश आंबेडकर यांच्यावर एफआयआर दाखल करुन त्यांना अटक व्हायला पाहिजे, असे ते विधान मध्यंतरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. यावर वंचित बहुजन आघाडीने थेट पोलिसांना आलेल्या पत्रासह पुरावा देत त्यांच्या या आरोपाला बिनबुडाचे ठरवले आहे.
वंचित बहुजन आघाडीने हे पत्र समाजमाध्यमांवर जाहीर केले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गाढवपणाचे प्रदर्शन करत काही दिवसांपूर्वी नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरोप करत ॲड.आंबेडकरांकडे दंगलीची माहिती कशी काय आहे? प्रकाश आंबेडकर यांना अटक करा, असं वक्तव्य केले होते.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आमचं एवढंच सांगणं आहे. आपण ज्येष्ठ मंत्री आहात. मंत्रिमंडळात काय होतंय, हे तुम्हाला माहित आहे. असे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
मंत्री नारायण राणे आणि त्यांचा मुलगा म्हणतो की, सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी माझ्याकडे पुरावे आहेत.तेव्हा आमची आपल्याला ही नम्र विनंती आहे की, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दंगलीच्या संदर्भात जे वक्तव्य केले होते. त्याचा पुरावा आम्ही देत आहोत.असेही वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
देशातील चार राज्यातील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सहा डिसेंबरनंतर देशात काहीही घडू शकते. महाराष्ट्रात कधीही दंगली घडू शकतात. त्यामुळे या संदर्भात पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती माझ्याकडे आहे. असा दावा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.