Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

प्रस्तावित रिंग रोडचा वाद: ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या आश्वासनानंतर नाशिकमधील महिलांचा लढा तूर्तास स्थगित

mosami kewat by mosami kewat
March 11, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
प्रस्तावित रिंग रोडचा वाद: ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या आश्वासनानंतर नाशिकमधील महिलांचा लढा तूर्तास स्थगित
       
नाशिक : नाशिकमधील अरिंगळे मळा परिसरात प्रस्तावित रिंग रोडमुळे घरे अतिक्रमणात जाण्याच्या भीतीने आठ महिलांनी सुरू केलेले अमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले. विशेष म्हणजे हे उपोषण कोणत्याही मंत्री, आमदार किंवा खासदारांच्या हस्ते नव्हे, तर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन (दादा) गांगुर्डे यांच्या हस्ते सोडण्यात आले.

अरिंगळे मळा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सुमारे १५० हून अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. ही कुटुंबे खाजगी जागेत राहत असून त्यांना घरपट्टी, पाणीपट्टीसह इतर मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता अधिकाऱ्यांनी या भागात मोजणी केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. (Nashik News)

सदर रिंग रोड ६० मीटर रुंदीचा करण्याचा प्रस्ताव असून, तो किमान १ किलोमीटर अंतरापर्यंत ४० मीटरपर्यंत मर्यादित ठेवावा, अशी स्थानिकांची मागणी आहे. या मागणीसाठी परिसरातील आठ महिलांनी अमरण उपोषण सुरू केले होते.

या आंदोलनाची माहिती दूरध्वनीद्वारे ॲड बाळासाहेब आंबेडकर यांना देण्यात आली. त्यांनी या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करत स्थानिकांच्या प्रश्नासाठी पुढील लढा वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे आश्वासन दिले. (Nashik News)

दरम्यान, मंगळवारी (दि. १०) रात्री सुमारे ८.३० वाजता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे नेते दिनेश जाधव, सम्यकचे जिल्हाध्यक्ष मिहीर गजबे, महासचिव पंडित नेटावते तसेच स्थानिक नगरसेविका भारती तंजापूरे, नगरसेवक योगेश भोर आणि माजी नगरसेवक संतोष साळवे यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलक महिलांशी सविस्तर चर्चा केली. (Nashik News)

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनावर आणि दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवत आंदोलनकर्त्या महिलांनी आपले अमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तसेच या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडी संपूर्ण ताकदीने या वस्तीसोबत उभी राहील, असा विश्वासही स्थानिक नागरिकांना देण्यात आला.

Tags: MaharashtranashikNashik newsPoliticalpoliticsVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

RTE प्रवेशातील ‘१ किमी’ अंतराची जाचक अट रद्द; वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला मोठे यश

Next Post

पेट्रोलियम क्षेत्रात ESMA लागू; केंद्र सरकारच्या धोरणावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका!

Next Post
पेट्रोलियम क्षेत्रात ESMA लागू; केंद्र सरकारच्या धोरणावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका!

पेट्रोलियम क्षेत्रात ESMA लागू; केंद्र सरकारच्या धोरणावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा
बातमी

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

by mosami kewat
September 29, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित करण्यात आलेल्या इराण...

Read moreDetails
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

September 29, 2026
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

September 29, 2026
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home